World Cup जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकारकडून होणार सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा!
- Published by:Saurabh Talekar
 
Last Updated:
CM Devendra Fadanvis On Maharastra Womens players : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्य सरकारच्या वतीने वर्ल्ड कर विनर महिला खेळाडूंचा सत्कार आणि त्यांना रोख पारितोषिक दिलं जाणार आहे.
CM Devendra Fadanvis Announcement : साऊथ अफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. या वर्ल्ड कप विनिंग टीममध्ये तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्य सरकारच्या वतीने या महिला खेळाडूंचा सत्कार आणि त्यांना रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याची घोषणा केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आयसीसी वर्ल्ड कपमध्ये महिला संघांनी वर्ल्ड कप जिंकला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंच्या सत्काराचा केला जाईल. यामध्ये स्मृती मानधना, राधा यादव आणि जेमिमा रॉड्रिक्स यांचा समावेश आहे. जेव्हा संपूर्ण टीम मुंबईत असेल तेव्हा राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण संघाचा सत्कार देखील केली जाईल. महिला खेळाडूंनी भारताची मान उंचावली आहे. महिला खेळाडूंना रोख पारितोषिक दिलं जाईल, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
advertisement
भारतीय महिला संघाने विश्वचषक २०२५ स्पर्धेचे जगज्जेतेपद मिळवल्याबद्दल या संघाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा सत्कार राज्य सरकार करेल तसेच त्यांना रोख रकमेचे पारितोषिक दिले जाईल @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #MaharashtraCM #CMDevendraFadnavis pic.twitter.com/iGIu916qZ7
— I Support Devendra (@DevendraForCM) November 4, 2025
advertisement
किती रोख पारितोषिक मिळणार?
महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंना किती रोख पारितोषिक दिलं जाईल? याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर टीम इंडियाच्या मेन्स खेळाडूंचा देखील सत्कार राज्य सरकारने केला होता. यामध्ये रोहित शर्मा, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता.
रेणुका सिंग ठाकूरला 1 कोटी
advertisement
दरम्यान, टीम इंडियाने रविवारी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर सोमवारी भल्या पहाटे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी टीम इंडियाची महिला क्रिकेटपटू रेणुका सिंग ठाकूर हीच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रेणुका ठाकुर हिच्याशी फोनवर चर्चा करून तिला 1 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर रेणुका ठाकूरला नोकरीची ऑफर दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकारकडून होणार सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा!


