TRENDING:

Viral Video: 106 व्या वर्षी आजोबांनी केलं हे काम, भलेभलेही करायला घाबरतील

Last Updated:

जगात धाडसी लोकांची काही कमतरता नाही. लोक अनेक साहसी गोष्टी करताना पहायला मिळतात. मात्र अनेकदा तरुणाई अशा साहसी गोष्टी करायला घाबरतात पण वृद्द सहजतेनं करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : जगात धाडसी लोकांची काही कमतरता नाही. लोक अनेक साहसी गोष्टी करताना पहायला मिळतात. मात्र अनेकदा तरुणाई अशा साहसी गोष्टी करायला घाबरतात पण वृद्द सहजतेनं करतात. असंच काहीसं एका 106 वर्षीय आजोबांनी करुन दाखवलं. भलेभले लोक घाबरतील अशी गोष्ट आजोबांनी वृद्धपणी केली.
106 व्या वर्षी आजोबांनी केलं हे काम
106 व्या वर्षी आजोबांनी केलं हे काम
advertisement

106 वर्षीय आजोबांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. आजोबांच्या धाडसाचं कौतुक कराल. एवढ्या वृद्धपणीची त्यांची आवड आणि धाडस कमाल आहे.

Wedding Video : शाळकरी मुलासोबत महिलेनं केलं लग्न, VIDEO ने उडाली खळबळ

आजोबांच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, 106 वर्षीय अल्फ्रेड स्कायडाइविंग करण्यासाठी विमानात उभे आहेत. त्यांच्यासोबत बाकी लोकही आहेत. मग एक व्यक्ती त्यांना घेऊन उडी मारतो. कॅमेऱ्यात त्यांचा आनंद दिसत आहे. ते अजिबात घाबरले नसून खूप उत्साही दिसत आहे. त्यांनी ही स्कायडाइविंग करत गिनिज बिक रेकॉर्ड बनवला. 14 हजार फूट उंचावरुन उडी मारत त्यांनी रेकॉर्ड बनवला. त्याचा कारनामा पाहून भलेभलेही गार झाले. त्यांनी लॅंडिंगही सुरक्षितरित्या केली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

advertisement

दरम्यान, अल्फ्रेड यांनी सांगितलं की, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांना वाटलं नव्हतं कि ते एवढ्या वर्ष जगतील. Guinness World Records च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या लोकांचं लक्ष वेधण्याचं काम करतोय. अनेकांनी आजोबांच्या धाडसाचं कौतुक केलंय. अनेक तरुणही बऱ्याचदा हे करण्यासाठी घाबरतात. मात्र अल्फ्रेडनं अगदी आरामात हे करुन दाखवलं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Viral Video: 106 व्या वर्षी आजोबांनी केलं हे काम, भलेभलेही करायला घाबरतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल