Wedding Video : शाळकरी मुलासोबत महिलेनं केलं लग्न, VIDEO ने उडाली खळबळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. अनेक लोक लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र लग्न करण्यासाठी वयाची मर्यादा असते. 18 वर्ष वय पूर्ण असल्याशिवाय कोणीही लग्न करु शकत नाही.
नवी दिल्ली : लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. अनेक लोक लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र लग्न करण्यासाठी वयाची मर्यादा असते. 18 वर्ष वय पूर्ण असल्याशिवाय कोणीही लग्न करु शकत नाही. भारतात लग्न करण्यासाठी मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 अनिवार्य आहे. मात्र काही लोक गैरप्रकारे कमी वयात काही मुलामुलींचे लग्न लावतात. असाच आणखी एक प्रकार उघडकीस आला. ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ उडवतोय. ज्यामध्ये एका महिलेचं लग्न मुलासोबत लावलं जातंय.
ठराविक वयाच्या कमी असल्यावर कुठेही लग्न करणं अपराधच मानलं जातं. मात्र एका महिलेनं आणि मुलानं लग्न केलं. तेही भरपूर लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हे लग्न पार पाडलं. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे लग्न करणारा वर मात्र खूप लहान आहे.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेजवर एक महिला लाल रंगाच्या नवरीच्या कपड्यांमध्ये आहे आणि तिच्यासमोर खूप लहान मुलगा उभा आहे. तो नवरदेवाच्या कपड्यांमध्ये हार घेऊन आहे. दोघेही एकमेकांना हार घालतात. बालविवाह सुरु असल्याचं पहायला मिळत आहे.
@divya_gandotra नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 40 सेकंदांचा हा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच धुमाकूळ पहायला मिळाला. लोकांनी या बालविवाहाला विरोध करत संतापही व्यक्त केला. व्हिडीओ शेअर करत युजरनं राजस्थान पोलीसला टॅग केलं आहे. त्यांनी पोलिसांना याविषयी कारवाई करण्यास सांगितलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 11, 2024 8:40 PM IST