वाघ जंगली प्राणी. जरी त्याला पाळलं तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. हेच दाखवणारा हा व्हिडीओ आहे. ज्यात वाघाने त्याला खाऊपिऊ घालून मोठं करणाऱ्या व्यक्तीवरच हल्ला केला आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.
झूमध्ये गेलेला चिमुकला, गोरिल्लाला पाहता पाहता त्याच्या कुशीत पडला; पुढे जे घडलं ते...
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक आलिशान घर दिसतं आहे. एक व्यक्ती तिथं धावताना दिसत आहे, त्या व्यक्तीच्या मागे वाघ आहे. वाघ व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. व्यक्ती पळत सुटते. ती दरवाजापर्यंत पोहोचते पण दरवाजा बंद असतो. वाघ तिथंच त्या व्यक्तीला पकडतो. पण ती तेव्हा कशीबशी त्या वाघाच्या तावडीतून निसटते आणि पुन्हा धावू लागते. पळता पळता त्या व्यक्तीचा तोल जातो आणि ती घसरून जमिनीवर पडते. तेव्हा वाघ त्याच्यावर तुटून पडतो. व्यक्तीचं सुदैव म्हणून तेव्हासुद्धा ती कशीबशी त्या वाघाच्या तावडीतून पुन्हा सुटते आणि पळू लागते.
advertisement
कोळी खतरनाक नाही असं बिलकुल समजू नका! इतका खतरनाक की एकदा चावला तर...
व्हिडीओ इथं संपला आहे. व्यक्ती आणि वाघाचा हा संघर्ष पुढेही सुरूच आहे. या व्यक्तीचं वाघानं पुढे काय केलं ते या व्हिडीओत दिसत नाही आहे.
@billionaire_life.styles नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. "स्वत:च्या मनोरंजनासाठी एखाद्याचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे?", "अशा धनदांडग्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी", "हे खेळणं नाही, त्याची जागा जंगलात आहे", अशा कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.