TRENDING:

असा ट्रॅफिक पोलीस पाहिला नसेल, डान्स करुन वाहतूक नियंत्रण, यामागे काय आहे कारण?

Last Updated:

2003 पासून ट्रॅफिक पोलिस विभागात कार्यरत असलेले रणजीत सांगतात की, सुरुवातीला नाचताना ट्रॅफिक हाताळण्यात अडचणींचा सामना करावा लागला. हे पाहून अनेकवेळा लोक हसले. पण सुमारे सहा महिन्यांनंतर ते हळूहळू यशस्वी होऊ लागला आणि अधिकाऱ्यांकडूनही त्यांना पूर्ण पाठिंबा मिळू लागला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल दवे, प्रतिनिधी
घटनास्थळाचे दृश्य
घटनास्थळाचे दृश्य
advertisement

इंदौर : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकांना हे व्हिडिओ विविध प्रकारचे व्हिडिओ आवडतात. त्यामुळे अनेक जणांना प्रसिद्धी मिळते. यातच एक ट्रॅफिक पोलीस हे सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहेत.

रणजीत सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅफिक पोलीस रणजीत सिंग हे फक्त इंदूरमध्येच नव्हे तर सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते इंदूरच्या हायकोर्ट चौकात ड्युटी करताना दिसतात. ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांची काम करण्याची पद्धत काहीशी वेगळी असते. रणजित सिंग नाचताना ट्रॅफिक कंट्रोल करतात. लोकांना त्याची शैली खूप आवडते. त्यामुळे लोक वाहतुकीचे नियमही पाळतात. मात्र, रणजीत सिंह यांनी ड्युटी करताना नाचणे हे कोणत्याही प्रसिद्धीसाठी केले नाही. तर त्यामागे एक करुण कहाणी आहे.

advertisement

रणजित सिंग यांच्या एका मित्राचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताने त्यांचे आयुष्य बदलले. यानंतर त्यांनी ठरवले की आता ते लोकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूक करणार आहे. यासाठी त्यांनी नृत्याच्या आवडीतून पाऊल उचलले आणि नंतर ते मागे हटले नाही.

रणजीत यांनी सांगितले की, त्यांचे वडील पोलीसमध्ये होते. त्यांना पाहूनच आपणही पोलीस अधिकारी व्हावे, असे त्यांना वाटले होते. त्यांना पोलीस वर्दी खूपच आवडायची. तसेच डान्सरही व्हायचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, ते आपले स्वप्न पूर्ण करू शकले नाही. याच कारणामुळे त्यांनी पोलीस सेवेत असताना ते आपले डान्सिंगचेही स्वप्न पूर्ण करत आहेत आणि लोकांना जागरुकही करत आहेत.

advertisement

रणजीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या 20 वर्षांच्या मित्राचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांनी ठरवले होते की, लोकांना मी वाहतूकीबाबत जागरूक करेन. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करायला लावेन. दरम्यान, ड्युटी करत असताना एकदा नाचत नाचत ड्रायव्हर्सना जागरूक करण्याचा विचार आला. त्यानंतर त्यांनी नाचून चौकाचौकात वाहतूक नियंत्रित करायला सुरुवात केली.

सुरुवातीला लोक हसायचे -

advertisement

2003 पासून ट्रॅफिक पोलिस विभागात कार्यरत असलेले रणजीत सांगतात की, सुरुवातीला नाचताना ट्रॅफिक हाताळण्यात अडचणींचा सामना करावा लागला. हे पाहून अनेकवेळा लोक हसले. पण सुमारे सहा महिन्यांनंतर ते हळूहळू यशस्वी होऊ लागला आणि अधिकाऱ्यांकडूनही त्यांना पूर्ण पाठिंबा मिळू लागला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल मालवणी नॉनव्हेज थाळी, फक्त 150 रुपयांत, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

रणजीत सिंह यांना 2019 मध्ये जीवन रक्षा पदकही मिळाले आहे. 13 जणांना वेळीच रुग्णालयात नेल्याने त्यांचे प्राण वाचले. तत्कालीन आयजींनी त्यांना हे पदक देऊन त्यांचा गौरव केला होता. आपण सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून आपली वाहतूक बुद्धी जागृत केली पाहिजे. चौकाचौकात नाचण्याचे माझे स्वप्न साकार होत असून वाहनचालक तेथून जाताना आनंदाने पाहत वाहतूक नियमांचे पालन करतात, असे त्यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
असा ट्रॅफिक पोलीस पाहिला नसेल, डान्स करुन वाहतूक नियंत्रण, यामागे काय आहे कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल