उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकावरील ही घटना. तीन जण एसी कोचमधून खाली उतरले. रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या हावडा टोकावर ते बसले होते. तिघंही घामाने ओलेचिंब झाले होते. एसीमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला इतका घाम कसा येतो, याचा जीआरपीला संशय आला. या आधारावर तिघांचीही चौकशी सुरू करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, कोचमध्ये खूप गरम होत होतं. कोचमधील एसी काम करत नसल्याबाबत त्यांनी काही सांगितलं नाही.
advertisement
तो ट्रेनमध्ये चढायचा, थोडं झोपायचा, उठताच श्रीमंत व्हायचा, सांगितली खास ट्रिक
पण जीआरपीला त्यांच्या हातावर काहीतरी दिसलं ज्यामुळे त्यांचं रहस्य उलगडलं आणि पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं.
तिघांच्याही हातात दोन मोबाईल दिसले. तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांची नावं संजय कुमार, विनोद कुमार आणि दिलीप साहू सांगितली. तिघंही अनुक्रमे रोहतक, हरियाणातील हिसार आणि उत्तर प्रदेशातील बांदा येथील राहणारे आहेत. तिघंही कट्टर गुन्हेगार आहेत. जीआरपी बऱ्याच काळापासून त्यांचा शोध घेत होती. त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये एक अंगठी, अँकलेट आणि सहा मोबाईल आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत सुमारे 150000 रुपये आहे.
Indian Railway : आई-आजीने तूप बनवून दिलंय, पण ट्रेनने नेताना रेल्वेचा हा नियम माहिती करून घ्या
रेल्वे प्रवास आनंददायी बनवण्यासोबतच प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल स्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये 'ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी' मोहीम सतत राबवते. या मोहिमेअंतर्गत, गाड्या आणि रेल्वे परिसरात चोरी आणि इतर गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये जीआरपीला सातत्याने यश मिळत आहे.
प्रवाशांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना रोखण्यासाठी प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपी प्रयागराज यांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करण्यात आली.