TRENDING:

चकना आणि दारु घेऊन आला शाळेत, ऑफिसमध्ये पिताना शिक्षकाचा VIDEO व्हायरल

Last Updated:

शिक्षक हे गुरु असतात. त्यामुळे प्रत्येकासाठी शिक्षकाचा दर्जा मोठा असतो. मात्र अनेकदा हे गुरुच, शिक्षकच काहीतरी चुकीचं करत असल्याचं निदर्शनास येतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : शिक्षक हे गुरु असतात. त्यामुळे प्रत्येकासाठी शिक्षकाचा दर्जा मोठा असतो. मात्र अनेकदा हे गुरुच, शिक्षकच काहीतरी चुकीचं करत असल्याचं निदर्शनास येतात. एकामुळे पूर्ण शिक्षकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. सध्या एका शिक्षकाचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये ते शाळेतच ड्रिंक करत आहेत.
ऑफिसमध्ये पिताना शिक्षकाचा VIDEO व्हायरल
ऑफिसमध्ये पिताना शिक्षकाचा VIDEO व्हायरल
advertisement

छत्तीसगडमधून हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं म्हटलं जात आहे. शाळेत टेबलवर बसून शिक्षकाचा ड्रिंक करताना, चकना खाताना व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

Fight Video: लाथ मारली, मग खाली पाडून हाणलं, बायकोनं दुकानातच नवऱ्याला धुतलं

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक शिक्षक शाळेत बसून दारू पिताना दिसत आहे. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑफिसच्या टेबलावर बसून पेग बनवत आहे आणि त्यासोबत चकनाही आणला आहे.

advertisement

जेव्हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने शिक्षकाला प्रश्न विचारला की, 'तुम्ही शाळेत दारू पितात का?' तर शिक्षक म्हणतात, 'आज मी टेन्शनमध्ये आहे त्यामुळेच मी दारू पितो, नाहीतर घरीच पितो.' हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गृहिणींनो, रिस्क का घेताय? जेवणाची ‘ही’ चूक पडेल महागात, काहीही होऊ शकतं, Video
सर्व पहा

@govindprataps12 नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 26 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतायेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
चकना आणि दारु घेऊन आला शाळेत, ऑफिसमध्ये पिताना शिक्षकाचा VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल