सोशल मीडियावर एक अॅनिमेटेड व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने दररोज त्यांचे अंतर्वस्त्र न बदलल्यास काय होऊ शकतं हे दाखवलं आहे. ज्यात सलग 60 दिवस अंडरवेअर बदलली नाही तर काय होईल हे दाखवलं आहे. व्हिडिओनुसार पहिल्या दिवसापासून बॅक्टेरिया वाढू लागतात, तिसऱ्या दिवसापासून तीव्र वास येतो, पाचव्या दिवशी खाज सुटते आणि जळजळ होते, दहाव्या दिवशी बुरशीजन्य संसर्ग होतो आणि तिसाव्या, साठाव्या दिवसापर्यंतचा परिणाम पाहून तर तुमच्या अंगावर काटाच येईल.
advertisement
पहिल्या 10 दिवसांत काय होतं?
तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून दुर्गंधी येऊ लागते कारण बॅक्टेरिया घाम आणि तेलाचं विघटन करून सल्फर संयुगे तयार करतात. महिलांमध्ये बॅक्टेरियल योनिओसिस किंवा यीस्ट संसर्ग (कॅन्डिडा) होतो. पुरुषांमध्ये जॉक इच हा एक बुरशीजन्य संसर्ग किंवा बॅलेनाइटिस ज्यात प्रायव्हेट पार्टची जळजळ होते हे सामान्य आहे.
Underwear : एकदा घातल्यानंतर अंडरवेअर कधी धुवायची? डॉक्टरांनी सांगितली योग्य वेळ
संसर्ग 7-10 दिवसांत तीव्र होऊ शकतो. त्वचेवर पुरळ, लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ होणे आणि वेदना सुरू होतात. जर संसर्ग पसरला तर फॉलिक्युलायटिस किंवा फोड येऊ शकतात. यूटीआयचा धोका खूप वाढतो. विशेषतः महिलांमध्ये, मूत्रमार्ग लहान असल्याने बॅक्टेरिया सहजपणे मूत्राशयापर्यंत पोहोचू शकतात.
एका महिन्यातच स्थिती आणखी बिकट
30 दिवसांनंतर ही स्थिती आणखी बिकट होते. दीर्घकालीन संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. बॅक्टेरिया रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, ज्याला सेप्सिस म्हणतात. सेप्सिस ही एक जीवघेणी स्थिती आहे जिथं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःला हानी पोहोचवू लागते. ताप, जलद हृदयाचे ठोके, श्वास लागणं, अवयव निकामी होणं आणि मृत्यू होऊ शकतो.
Underwear : अशी अंडरविअर जी वापरल्यानंतर खाता येते; डॉक्टरनेच दिली माहिती
जरी 60 दिवसांपर्यंत एकच अंडरवेअर घातल्यानंतर मृत्यू होणं फारच दुर्मिळ आहे, पण जर कोणी आधीच डायबेटिज, कमकुवत प्रतिकारशक्ती किंवा त्वचेच्या समस्यांनी ग्रस्त असेल तर धोका लक्षणीयरित्या वाढतो.
डॉक्टर आणि स्वच्छता तज्ज्ञांच्या मते, हा व्हिडिओ थोडा जास्त नाट्यमय आहे, पण मूळ मुद्दा अगदी बरोबर आहे. दररोज इनरवेअर बदलणं गरजेचं आहे. अंडरवेअर प्रायव्हेट पार्ट झाकतात जिथं घाम, मृत त्वचेच्या पेशी, बॅक्टेरिया आणि कधीकधी मूत्र किंवा विष्ठेचे अंश राहतात. जर कपडे घाणेरडे राहिले तर ते बॅक्टेरियासाठी एक प्रजनन स्थळ बनतं. त्यामुळे डॉक्टर दररोज अंडरवेअर बदलण्याचा सल्ला देतात. विशेषतः उन्हाळ्यात किंवा जास्त घाम येत असेल तर तुम्ही ते दोनदाही बदलू शकता.
सूचना : हा लेख फक्त सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहेत. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे.
