फ्रिजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून सगळ्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कॅमेरा जसा फ्रिजच्या मागे जातो, तसा धक्काच बसतो. कारण फ्रिजच्या मागून येणारा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नाही तर चक्क सापाचा होता. फ्रिजच्या मागे साप बसला होता. फ्रिजच्या मागे जी जाळी असते त्या जाळीच्या वरच्या भागावर वेटोळे घालून हा साप बसला होता.
advertisement
रात्री झोपताना अचानक हलू लागली उशी अन्..., नागपुरातील घरात घडला भयंकर प्रकार, Watch Video
@adilmirzasnake या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आदिल मिर्झा हा सर्पमित्र आहे, जो उत्तराखंडमध्ये राहतो. तो एक प्रशिक्षित साप पकडणारा आहे.
घरात फ्रिजच्या मागे बसलेला हा साप कोणताही सामान्य साप नव्हता, तर तो भारतातील सर्वात विषारी क्रेट साप. सर्पमित्र आदिल त्या सापाल पकडतो आणि नंतर जंगलात सोडतो.
आदिल म्हणतो लोक अनेकदा चूक करतात की ते प्रिंटेड बेडशीट वापरतात. यामुळे जर हा साप बेडवर चढला तर तो दिसत नाही. संध्याकाळी शक्यतो पांढरी बेडशीट पसरवण्याचा सल्ला त्याने दिला आहे.
एका सापाला मारलं, समोर अचानक उभे राहिले 50 साप, शेतकऱ्याच्या घरात भयंकर प्रकार
पावसाळ्यात सापांची संख्या वाढल्याने ही भीती अधिकच वाटते. जर तुमच्या घराच्या आसपास साप दिसत असतील तर घाबरण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला सापांपासून सुरक्षित राहण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत.
सापांना दूर ठेवण्याचे नैसर्गिक उपाय
वनस्पतींचा वापर : नागदौना, स्नेक प्लांट, गेंदे, लेमनग्रास आणि कॅक्टस या वनस्पतींची गंध सापांना आवडत नाही. या वनस्पती घराच्या आजूबाजूला लावल्याने सापांना घरात प्रवेश करणे कठीण होतं.
तीव्र वास : नवरत्न तेल, कार्बोलिक एसिड, बेकिंग पाउडर, फॉर्मलिन आणि रॉकेल, कीटकनाशके यांसारख्या तेज गंधाच्या पदार्थांचा वापर करून सापांना दूर ठेवता येते. ही द्रव्ये थेट सापावर टाकू नयेत, तर त्यांच्या लपण्याच्या जागी टाकावीत.
प्रकाश : साप कायम अंधार शोधत असतात. त्यांच्या डोळ्यांना अंधारात स्पष्ट दिसतं, तर प्रकाशाचा त्यांना त्रास होतो. इतकंच नाही, तर प्रखर उन्हाने सापांची दृष्टी जाऊसुद्धा शकते. याचाच अर्थ असा आहे की, अंधाऱ्या भागात साप दिसल्यास तिथे प्रकाश करून तुम्ही त्याला पळवून लावू शकता.
आवाज : शिवाय सापांना मोठा आवाजही सहन होत नाही. त्यामुळे जर पावसाळ्यात घरातल्या अडगळीच्या, अंधाऱ्या खोलीत साप शिरला, तर तिथे प्रकाश करून जोरजोरात भांडी वाजवून त्याला पळवून लावा, असं तज्ज्ञ सांगतात.
या गोष्टी घरापासून लांब ठेवा
लाकडाचे ढिग : लाकडाचे ढिग, जुनी वस्तू आणि कचरा या ठिकाणी सापांना लपण्याची जागा मिळते. त्यामुळे या जागा स्वच्छ ठेवा.
पाण्याचं ठिकाण : सापांना पाणी पिण्यासाठी ठिकाण मिळाले तर ते घरात येण्याची शक्यता असते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.
उंदीर आणि इतर कीटक : उंदीर आणि इतर कीटक हे सापांचे खाद्य असते. त्यामुळे यांचा उपद्रव कमी करून सापांनाही आपल्यापासून दूर ठेवता येते.
साप दिसला तर काय करायचं?
सापांची भीती बाळगणे स्वाभाविक आहे. पण त्यांच्याबद्दल जागरूक असणे आणि योग्य पद्धतीने त्यांच्यापासून सुरक्षित राहणं महक्त्वाचे आहे. जर तुम्हाला साप दिसला तर घाबरू नका आणि त्याच्या जवळ जाऊ नका. त्याला शांतपणे जाण्याचा मार्ग दाखवा. साप हे पर्यावरणासाठी महत्त्वाचे प्राणी आहेत. सापांना मारणं कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यांना मारण्याऐवजी त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडा. यासाठी सर्पमित्रांची मदत घ्या. साप चावला असेल तर ताबडतोब डॉक्टरांच्या संपर्कात या.