एका सापाला मारलं, समोर अचानक उभे राहिले 50 साप, शेतकऱ्याच्या घरात भयंकर प्रकार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Snake news : साप दिसताच शेतकऱ्याने त्या सापाला मारला. पण एका सापाला मारल्यानंतर असं काही घडलं की त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. पुढे जे घडलं ते भयानक आहे.
लखनऊ : साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. तर काही व्यक्ती इतक्या धाडसी असतात की सापाला मारायलाही मागेपुढे पाहत नाही. अशीच एक व्यक्ती जिने एका सापाला मारलं. पण त्यानंतर जे घडलं ते भयंकर आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
रविवारी 1 जून रोजी घडलेली घटना आहे. समौली इथं राहणारा शेतकरी महफूज आपल्या घरात काम करत होता. त्यावेळी त्याला एक साप दिसला. साप सुमारे एक ते दीड फूट लांब होता. साप दिसताच त्याने त्या सापाला मारला. पण त्यानंतर असं काही घडलं की त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.
एका सापाला मारल्यानंतर अचानक एकामागून एक साप येतच राहिले. संपूर्ण कुटुंब सापाला मारू लागलं. इतके साप बाहेर आल्याची बातमी गावात पसरली आणि सर्व गावकरी घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी साप बाहेर येत असलेल्या जागेचा शोध घेतला. तेव्हा त्यांना आढळलं की शेतकऱ्याच्या घराच्या दरवाजातून साप बाहेर येत आहेत. रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 52 साप बाहेर आले. ज्यांना मारून खड्ड्यात पुरण्यात आले.
advertisement
एका शेतकऱ्याच्या घरात अचानक सापांचा समूह आढळल्याने खळबळ उडाली. कुटुंबाने या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दिली नाही.
पावसाळ्यात दिसणारे साप खतरनाक
'साप हा असा प्राणी आहे जो उन्हाळा आणि पावसाळ्यात विशेष सक्रिय असतो. त्यामुळे या दिवसांत लहान, मोठे साप ठिकठिकाणी पाहायला मिळतात. परंतु थंड वारे वाहताच साप निद्रावस्थेत जातात. या स्थितीला म्हणतात 'Hibernation', असं सर्पमित्र मुरारी सिंह यांनी सांगितलं.
advertisement
सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निद्रावस्थेत असताना साप अजिबात वणवण भटकत नाहीत, अगदी शिकारीसाठीही नाही. ते काही खातही नाहीत, फक्त एका ठिकाणी थांबून स्वतःसाठी आसरा शोधतात आणि हळूहळू श्वास घेऊन विश्रांती घेतात. अधूनमधून ऊन मिळवण्यासाठी ते आपल्या सुरक्षित ठिकाणाहून बाहेर येतात आणि मग पुन्हा जाऊन झोपतात. पुढच्या ऋतूत जोमानं शिकार करता यावी यासाठी ते या दिवसांत शरीरात ऊर्जा साठवून ठेवतात. याच स्थितीमुळे त्याला पुढच्या ऋतूंमध्ये सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा मिळते.
advertisement
साप जवळपास 3 ते 4 महिने शीतनिद्रेत असतात. अनेक दिवस काहीच न खाल्ल्यामुळे सापांच्या शरीरातली चरबी कमी होते. शरीर सडपातळ झाल्यानं ते आणखी वेगानं सरपटतात. त्यामुळे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात आढळणारे साप अतिशय खतरनाक असतात.
Location :
Uttar Pradesh
First Published :
June 02, 2025 12:44 PM IST