बापरे! महिलेच्या कानातून काढला साप, आत गेला कसा? Shocking Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Snake in ear : व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या महिलेच्या कानात साप लटकतो आहे. एक व्यक्ती चिमट्याच्या मदतीने महिलेच्या कानातील साप काढत आहे.
नवी दिल्ली : साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. समोर साप दिसला तरी भीती वाटते. असा साप कानात घुसला हे वाचूनच तुमचा थरकाप उडाला असेल. पण एका महिलेच्या बाबतीत हे घडलं. तिच्या कानात घास घुसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
महिलेच्या कानात साप असल्याचा हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येईल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या महिलेच्या कानात साप लटकतो आहे. एक व्यक्ती चिमट्याच्या मदतीने महिलेच्या कानातील साप काढत आहे. महिला वेदनेने ओरडते आणि स्थानिक भाषेत काहीतरी बोलते आहे.
advertisement
तो माणूस एका लहान चिमट्याने सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. एवढंच नाही तर तो त्या प्राण्याला दुखापत होऊ नये याची पूर्ण काळजी घेत आहे. त्याच वेळी महिलेच्या चेहऱ्यावर भीती आणि वेदना स्पष्टपणे दिसून येतात.
advertisement
@therealtarzann नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत महिलेच्या कानात साप लटकताना दिसतो आहे. पण हा भयानक प्राणी महिलेच्या कानात कसा शिरला? आतापर्यंत हे गूढ उलगडलेले नाही. हा व्हिडिओ कधी आणि कुठे रेकॉर्ड करण्यात आला हे देखील कळलेलं नाही. पण ही क्लिप सोशल मीडियावर नक्कीच वाऱ्यासारखी पसरली आहे, ज्यामुळे नेटिझन्स अवाक झाले आहेत.
Location :
Delhi
First Published :
May 07, 2025 10:44 AM IST