Uber राईड अनेक लोक बुक करतात. मात्र यामध्येही ग्राहक आणि ड्रायव्हर वाद घालताना दिसून येतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला Uber ड्रायव्हरसोबत भांडत आहे. ती त्याला अर्वाच्च भाषेत बोलत असून त्याची लायकी काढतेय. ती उबेरची सफाई आणि स्वच्छता आणि नीटनेटकेपणावरुन त्याला बोलत आहे. मात्र ती ज्याप्रकारे त्याच्याशी बोलत आहे ते धक्कादायक आहे. तिनं ड्रायव्हरवर अनेक वाईटरित्या गोष्टी बोलल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ ड्रायव्हरने शूट केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
घरातील टॉयलेटमध्ये निघाले 35 साप, VIDEO पाहून उडेल थरकाप
@gharkekalesh नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 2 मिनिट 31 सेकंदांचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओनं इंटनेटवर खळबळ उडवली आहे. व्हिडीओवर कमेंट करत लोकांनी महिलेच्या वागण्यावर संताप व्यक्त केलाय. ती ज्याप्रकारे वाईटरित्या बोलत आहे त्यावर आक्षेप घेतलाय. काही लोकांनी महिलाचीही बाजू घेतली की, पैसे देतोय तर गाडीची सफाईदेखील असायला हवी.
दरम्यान, अशा अनेक घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कधी ड्रायव्हरची चुकी असते तर कधी पॅसेंजरची. अशी वादाचे, भांडणाचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.