घरातील टॉयलेटमध्ये निघाले 35 साप, VIDEO पाहून उडेल थरकाप

Last Updated:

सापासारख्या विषारी प्राण्यांना पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यामुळे लोक सापाला पाहून दुरुनच धुम ठोकतात. चुकूनही साप जवळून गेला तरी अंगावर काटा उभा राहतो आणि काहींची तर बोबडीही वळते.

घरातील टॉयलेटमध्ये निघाले 35 साप
घरातील टॉयलेटमध्ये निघाले 35 साप
नवी दिल्ली : सापासारख्या विषारी प्राण्यांना पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यामुळे लोक सापाला पाहून दुरुनच धुम ठोकतात. चुकूनही साप जवळून गेला तरी अंगावर काटा उभा राहतो आणि काहींची तर बोबडीही वळते. सापाविषयी अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अनेकदा हे साप घरातही आढळून येतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये घराच्या टॉयलेटमध्ये अचानक सापांची सेनाच आली. हे दृश्य थरकाप उडवणारं आहे.
घरातील टॉयलेटमध्ये अचानक सापांची सेना आढळली. हे पाहून घरातल्यांची अवस्था टाईट झाली. आसाममधील नागौन जिल्ह्यातील ही घटना असल्याचं म्हटलं जातंय. या व्हिडीओनं इंटरनेटवर खळबळ उडवली आहे.
समोर आलेला व्हिडीओ एनआयनं आपल्या x अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टॉयलेटला जाण्यासाठी घरातील सदस्यानं टॉयलेटचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला हे असं भयानक दृश्य दिसलं. संपूर्ण सांपाची सेना टॉयलेटमध्ये होती. हे पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल. सापांना पाहताच कुटुंबाने सर्पप्रेमीला बोलावून त्यांना काढायला सांगितलं. एकूण 35 साप टॉयलेटमधून बाहेर काढले.
advertisement
दरम्यान, नुकत्याच बनवलेल्या एका नव्या बाथरुममध्ये हे साप आढळले. त्यामुळे कुठेही आणि कशाही जागेतून साप येऊ शकतात. त्यामुळे सतत सावधानी आणि सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
घरातील टॉयलेटमध्ये निघाले 35 साप, VIDEO पाहून उडेल थरकाप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement