यामध्ये सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. दुचाकी, चारचाकी, ट्रक, बस इत्यादी ना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे, मग वाहन जुने असो वा नवे.
HSRP म्हणजे काय? (what is HSRP number plate)
ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो.
advertisement
HSRP नंबर प्लेट लावणं का गरजेचं? यामागची कारणं समजून घेऊ
1. वाहनाची चोरी रोखण्यासाठी:
HSRP प्लेटमध्ये युनिक लेझर कोड, होलोग्राम आणि नंबर एम्बॉस केलेले असतात, जे बनावट करणे अवघड असते. त्यामुळे गाडी चोरी झाली तरी पोलिसांना वाहन ओळखणं आणि शोधणं सोपं जातं.
2. वाहनाचं ओळखपत्र प्रमाणे काम:
HSRP ही फक्त नंबर प्लेट नसून वाहनाचं 'ओळखपत्र' आहे. ही सरकारमान्य असून त्यावरून वाहनाची खरी मालकी, रजिस्ट्रेशन, इंधन प्रकार इ. माहिती लगेच कळते.
3. बनावट नंबर प्लेट्सला आळा:
पूर्वी चोरी किंवा गुन्ह्यासाठी बनावट नंबर प्लेट्स वापरल्या जायच्या. HSRP मुळे हे थांबवलं जातं कारण ती सरकारी अधिकृत पद्धतीनेच तयार केली जाते.
4. कायदेशीर बंधन:
मोटार वाहन कायद्यांतर्गत HSRP प्लेट लावणं सर्व वाहनांसाठी अनिवार्य आहे. जर ही प्लेट नसेल तर दंड होण्याची शक्यता आहे. काही राज्यांत ₹5000 पर्यंत दंड आकारला जातो.
5. ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी उपयुक्त:
ट्रॅफिक पोलिस किंवा सीसीटीव्हीवरून वाहन ओळखणं सोपं होतं. अशा प्रकारे कायद्याचे पालन करणाऱ्या वाहनांची खात्री पटते.
6. वाहन आणि प्रवाशांचा सुरक्षिततेसाठी:
ही प्लेट चांगल्या क्वालिटीची असते, जी गाडी चालवताना ढिली होत नाही, फुटत नाही आणि स्पष्ट दिसते, त्यामुळे अपघात किंवा गैरसमज टाळता येतो.
थोडक्यात, HSRP नंबर प्लेट लावणं म्हणजे फक्त नियम पाळणं नाही, तर तुमच्या वाहनाची सुरक्षितता, ओळख आणि कायदेशीरतेसाठी एक गरजेचं पाऊल आहे. हे तुमचं वाहन ‘सुरक्षित’, ‘शासनमान्य’ आणि ‘ओळखण्यास सोपं’ बनवतं.
HSRP नंबर प्लेट कशी मिळवायची? (how to get HSRP number plate)
ही प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत आहे.
आधी ऑनलाइन पद्धत समजून घेऊ
-अधिकृत HSRP च्या वेबसाइटवर जा.
-तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
-गाडीची माहिती (चेसी नंबर, गाडीचा नंबर इ) द्या आणि तुमच्या जवळच्या -RTO अथवा डीलरचा पत्ता निवडा.
-दिलेल्या तारखेला तुमच्या गाडीला HSRP प्लेट बसवून घ्या.
ऑफलाइन पद्धत काय?
-तुमच्या जवळच्या अधिकृत वाहन डीलर किंवा RTO ऑफिसमध्ये जा.
-आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा.
-पैसे भरून पावती मिळवा.
-दिलेल्या वेळेनुसार नवीन नंबर प्लेट बसवून घ्या.