एक ट्रेनचा हा व्हिडीओ आहे. ट्रेनच्या आतून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. ज्यात एक तरुणी खिडकीजवळ आरामात सीटवर बसलेली दिसते आहे. अचानक एक व्यक्ती खिडकीच्या बाहेर दिसू लागतो. जो स्वतःला सुपरमॅन समजून अगदी सुपरमॅनसारखा उडताना दिसतो आहे. उडता उडता तो खिडकीत बसेलल्या तरुणीला काहीतरी विचारतो.
इंजिनीअर तरुण चोरायचा महिलांचे अंडरवेअर, कारण ऐकून पोलीसही अवाक
advertisement
तरुणी त्याच्याकडे शांतपणे पाहतच राहते ती त्याचाशी काहीच बोलत नाही. ट्रेनच्या बाहेर खिडकीजवळ उडणारा तो तरुण अचानक गायब होतो आणि तरुणी तिच्यासमोर बसलेल्या कुणाकडे तरी पाहून हसू लागते. त्या तरुणाचं काय होतं हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं नाही.
हा व्हिडिओ @trendy_larka नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'महिला जास्त काळ का जगतात?' असं लिहिलं आहे.
हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हसणारे इमोजी शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हालाही हसायला आलं असेल, पण हे करणं खरोखर धोकादायक आहे. हा व्हिडिओ अशा प्रकारे बनवण्यात आला आहे की सुपरमॅन चालत्या ट्रेनच्या खिडकीजवळ उडत येतो आणि काहीतरी विचारून निघून जातो.
बोंबला! बॉयफ्रेंडच्या तोंडात अडकला गर्लफ्रेंडचा हात, पाहून डॉक्टरही शॉक, हे घडलं कसं काय?
व्हायरल होत असल्याने आम्ही हा व्हिडीओ तुम्हाला दाखवला आहे. पण चालत्या ट्रेनमध्ये असा स्टंट करणं खूप धोकादायक आहे. न्यूज18मराठी असे स्टंट करण्याचं प्रोत्साहन देत नाही किंवा तसा कोणताही उद्देश नाही. तुम्ही असे स्टंट करू नका, हे न्यूज18मराठीचं आवाहन आहे.