ली नावाची ही महिला. जिनं तिचा पती ही याच्या घरात आपल्या भावंडांच्या मदतीने छुपा कॅमेरा लावला. एक दिवस तिने कॅमेरातील फुटेज पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. तिचा नवरा तिला दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवताना दिसला. ही महिला तिचा नवरा भाड्याने राहत असलेल्या घराची मालकीण होती. वांग असं तिचं नाव.
महिलेने आपल्या नवऱ्याचे असे विवाहबाह्य संबंध पाहिल्यानंतर तिला राग अनावर झाला आणि तिने नवरा आणि तिच्या प्रेयसीचे सगळे प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
advertisement
एसी ट्रेनमध्ये घामाघूम झाले 3 प्रवासी, रेल्वे पोलीसही शॉक, हात पाहताच धक्का
वांगने हे व्हिडीओ पाहिले. आपले प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजताच तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी लीला व्हिडिओ काढून टाकण्याचं आवाहन केलं पण तिने नकार दिला. त्यानंतर वांगने ली आणि तिच्या भावंडांविरुद्ध गोपनीयता अधिकार, प्रतिष्ठा आणि प्रतिमा अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत खटला दाखल केला. वांगने भरपाई, सार्वजनिक माफी आणि सर्व मजकूर काढून टाकण्याची मागणीही केली.
टेंग काउंटी कोर्ट म्हणालं, की लीने वांगच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं उल्लंघन केलं. पण नुकसान आणि सार्वजनिक माफीचे दावे नाकारले. म्युनिसिपल इंटरमीडिएट पीपल्स कोर्टानेसुद्धा हा निर्णय कायम ठेवला. वांगने विवाहित पुरूषाशी संबंध ठेवून सार्वजनिक सुव्यवस्था आणि सामाजिक मूल्यांचं उल्लंघन केलं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. वांगच्या मानसिक आरोग्यावर कोणताही गंभीर परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे नव्हते, म्हणून भरपाई आणि माफीची मागणी फेटाळण्यात आली.
अरे देवा! 10 वर्षे पैसे जमवून घेतली 2.5 कोटींची फरारी, एका तासात त्याची राख झाली, कशी काय?
त्याचवेळी लीच्या कृतींचे वर्णन मर्यादेपलीकडे असल्याचं सांगण्यात आलं. स्वतःच्या बचावात ली म्हणाली की तिने कॅमेरा बसवला कारण घर तिच्या पतीचं होतं आणि तिला मुलाची सुरक्षितता सुनिश्चित करायची होती. व्हिडिओ शेअर करणं ही तिच्या पतीच्या अविश्वासाविरुद्ध तिची प्रतिक्रिया होती.