अरे देवा! 10 वर्षे पैसे जमवून घेतली 2.5 कोटींची फरारी, एका तासात त्याची राख झाली, कशी काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Car burn : त्या माणसानं सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर करून आपले दुःख व्यक्त केलं. त्याने लिहिलं की डिलिव्हरी झाल्यानंतर अवघ्या एका तासात त्याच्या गाडीला आग लागली.
नवी दिल्ली : कल्पना करा की जर तुम्हाला खूप इच्छा असलेली एखादी गोष्ट मिळाली आणि ती मिळाल्यानंतर लगेचच तुमच्यापासून हिरावून घेतली तर काय होईल. एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडल. त्या गरीब माणसाने 10 वर्षे पैसे वाचवले, पै न पै गोळा करून त्याने त्याची आवडती कार 2.5 कोटी रुपयांना खरेदी केली. पण त्याचं नशीब इतकं वाईट होतं की गाडी डिलिव्हरी झाल्यानंतर अवघ्या एका तासातच त्याची राख झाली.
जपानमधील ही घटना आहे. 33 वर्षीय होनकॉन एक म्युझिक प्रोड्युसर आहे. त्याला फरारी 458 स्पायडर कार खूप आवडली होती. त्याने त्या कारसाठी तब्बल 10 वर्षे पैसे साठवले. 16 एप्रिल रोजी त्याने ती कार 2.5 कोटी रुपयांना खरेदी केली. गाडी घेऊन तो ऐटीत निघाला. पण टोकियोच्या शुतो एक्स्प्रेसवर असताना अचानक त्या गाडीला आग लागली. कोट्यवधी रुपयांची कार त्याच्या डोळ्यादेखत पेटली. त्याने लगेच गाडी थांबवली आणि तो गाडीतून खाली उतरला.
advertisement
20 मिनिटांत आग विझवण्यात आली, पण तोपर्यंत गाडी पूर्णपणे आगीत जळून खाक झाली होती. फक्त समोरचा छोटासा भाग दिसत होता. आग का लागली याबद्दल कोणतीही माहिती नाही. आग लागण्यापूर्वी गाडीला अपघात झाला नव्हता.
社長がフェラーリ買ったらしいから乗せてもらった1時間後に燃えた pic.twitter.com/kZq4QYgwkZ
— ポケカメン@ちょこらび (@GC5R5OGIKgV0yvz) April 16, 2025
advertisement
त्या माणसानं सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर करून आपले दुःख व्यक्त केलं. त्याने लिहिले की डिलिव्हरी झाल्यानंतर अवघ्या एका तासात त्याच्या गाडीला आग लागली. द सन वेबसाइटशी बोलताना होनकॉन म्हणाला की, असं काही घडेल याची त्याने कधीच कल्पना केली नव्हती. त्याला वाटतं की जपानमध्ये तो एकमेव व्यक्ती असेल ज्याला इतकं दुःख सहन करावं लागलं असेल.
advertisement
या अपघातात होनकॉनला दुखापत झाली नाही आणि तो पूर्णपणे बरा आहे याबद्दल लोकांनी सोशल मीडियावर कमेंट केल्या आणि समाधान व्यक्त केलं. एकाने म्हटले की फरारीच्या बाबतीत असं घडायला नको होतं. त्यापैकी एकाने सांगितलं की तो सुरक्षित आहे हे चांगलं झालं.
Location :
Delhi
First Published :
April 26, 2025 7:44 AM IST
मराठी बातम्या/Viral/
अरे देवा! 10 वर्षे पैसे जमवून घेतली 2.5 कोटींची फरारी, एका तासात त्याची राख झाली, कशी काय?