ज्याने हे गाणं ऐकलं त्याचा मृत्यू झाला, 62 वर्षांनंतर उठवला बॅन, चुकूनही ऐकू नका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sad song : आजवर तुम्ही बरीच गाणी ऐकली असतील. पण एक असं गाणं जे जगातील सर्वात सॅड साँग म्हणून हे गाणं ओळखलं जाऊ लागलं आणि त्यावर तब्बल 62 वर्षे बॅनही होता.
नवी दिल्ली : आजकाल गाणं म्हणजे कित्येक फिल्म्सचा जीव आहे. पिक्चरआधी त्या फिल्मची गाणी रिलीज केली जातात. गाणं म्हणजे एक प्रकारचं औषधच. आपण कितीही तणावात असलो तरी गाणं ऐकल्यानंतर मनावरील ताण हलका होतो. त्यामुळे आपल्याला कसलं टेन्शन आलं की आपण आपलं आवडतं गाणं ऐकतो. आनंदी असलो की हॅप्पी साँग, उर्जा हवी असली की तडक-भडक साँग, प्रेमात असलो की रोमँटिक साँग, प्रेमभंग झाल्यावर ब्रेकअप साँग, तर कधी सॅड साँग. मात्र कधी कोणतं गाणं जीवघेणं ठरल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?
एक असं गाणं ज्याने अनेकांचे बळी घेतले असं म्हणतात. हे गाणं ऐकणारा आपलं आयुष्य संपवायचा असं सांगितलं जातं. या गाण्यामुळे 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं. या गाण्याची दहशत इतकी होती की तब्बल 62 वर्षे या गाण्यावर बंदी होती. हंगेरीतील संगीतकार रेजसो सेरेज यांनी 1933 साली सॅड संडे किंवा ग्लुमी संडे हे गाणं रचलं. हे गाणं प्रेमाशी संबंधित होतं आणि या गाणं इतकं काळजाला भिडणारं होतं की ऐकणाऱ्या आपल्या वेदना आठवायच्या. त्यानंतर हे गाणं ऐकून कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर आत्महत्या रोखण्यासाठी हे गाणं पुन्हा कंपोझ करण्यात आलं. मात्र तरीही लोकांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी झालं नाही. त्यामुळे 1941 हे गाणं बॅन करण्यात आलं.
advertisement
2003 साली त्यावरील बंदी उठवण्यात आली. या गाण्याला हंगेरीअन सुसाइड साँग म्हणूनही ओळखलं जातं. हे गाणं आजही युट्युबर आहे. मात्र आता हे गाणं ऐकल्यानंतर लोकांना प्रश्न पडला की या गाण्यात असं काय होतं, जे ऐकून लोक आत्महत्या करायचे.
सेरेज यांनी आपल्या प्रेमभंगातून हे गाणं लिहिल्याचं सांगितलं जातं. आयुष्यात आपली ओळख बनवण्यात संघर्ष करणारे सेरेज यांना यश मिळालं नाही. रेजसो एक पिआनोही वाजवायचे आणि त्यात त्यांना करिअर करायचं होतं. मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही म्हणून त्यांच्या प्रेमिकाने त्यांची साथ सोडली होती. प्रेमात धोका मिळाल्याने सेरेस यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आपल्या प्रेमिकाच्या आठवणीत त्यांनी गाणं लिहिलं आणि त्याला ग्लुमी संडे असं नाव दिलं. त्यानंतर हे गाणं खूप प्रसिद्ध झालं, मात्र हेच गाणं मृत्यूसाठीही कारणीभूत ठरू लागलं.
advertisement
या गाण्याबाबत ओमेगा : जर्नल ऑफ डेथ अँड डाईंमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं संशोधन रिसर्च गेट या वेबसाईटवरही देण्यात आला आहे.
Location :
Delhi
First Published :
April 25, 2025 7:47 AM IST
मराठी बातम्या/Viral/
ज्याने हे गाणं ऐकलं त्याचा मृत्यू झाला, 62 वर्षांनंतर उठवला बॅन, चुकूनही ऐकू नका