Shocking! परफ्युममुळे महिलेला कापावे लागले हातपाय, असं घडलं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्हाला वाचूनच धक्का बसला असेल. परफ्युममुळे महिलेला हातपाय का कापावे लागले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नेमकं या महिलेसेसोबत काय घडलं पाहुयात.
शरीराला घामाची दुर्गंधी येऊ नये, म्हणून कित्येक लोक परफ्युम मारतात. आता उन्हाळ्यात तर याची गरज जास्तच वाटते. पण याच परफ्युममुले एका महिलेने आपले हातपाय गमावले आहेत. इंग्लंडच्या मोरेकॅम्बे येथील ही घटना आहे. इथं राहणारी 48 वर्षांची ही महिला, गिल हॅडिंग्टन असं तिचं नाव. परफ्युममुळे तिला तिचे हातपाय कापावे लागले आहेत.
advertisement
तिच्या पायावर परफ्यूमची बाटली पडली होती. सुरुवातीला स्कॅनमध्ये काहीही आढळलं नाही, परंतु कालांतराने तिला असह्य वेदना, फोड, अल्सर आणि पायात सूज येऊ लागली. परिस्थिती इतकी बिकट झाली की पाय वाकू लागला आणि हाड बाहेर आले. वेदना इतक्या तीव्र होत्या की तिला दिवसाला 30 पेनकिलर घ्यावे लागत होते, तरीही आराम मिळत नव्हता.
advertisement
advertisement
advertisement