आग्रा : दररोज विविध प्रकारच्या घटना समोर येत असतात. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला आपल्याच मेहुणीसोबत डान्स करणे चांगलेच महागात पडले आहे. दाम्पत्य आपल्या एका नातेवाईकाकडे लग्नात गेले होते. याठिकाणी डीजेवर त्या व्यक्तीची मेहुणी डान्स करत होती. तिने इशारा करत आपल्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणजे तिच्या दाजीला बोलावले. आता मेहुणीने बोलावल्याने त्याने तिला नकार न देता तो तिथे तिच्यासोबत आला आणि डान्स करू लागला. मात्र, हा सर्व प्रकार पाहून त्या व्यक्तीच्या पत्नीला खूप राग आला आणि तिने त्या सर्वांसमोर त्या व्यक्तीला चपलीने मारहाण केली.
advertisement
आग्रामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. एक मेहुणी आणि तिचा दाजी एका लग्न समारंभात सोबत डान्स करत होते. त्यावेळी दोघांना सोबत डान्स करताना पाहून त्या व्यक्तीच्या पत्नीचा चेहरा रागाने लाल झाला आणि तिने आपल्या पतीला चपलेने मारहाण केली. या घटनेनंतर लग्नात शांतता पसरली. नेमकं काय झालं, पत्नीने आपल्या पतीला चपलेने का मारहाण केली, हे लोकांना कळत नव्हते.
आग्रा पोलीस लाइनमध्ये चालणाऱ्या कौटुंबिक समुपदेशन केंद्र ही घटना घडली. मथुरा जिल्ह्यातील मगोर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी महिलेचे लग्न आग्रा येथील कगरौल पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी तरुणासोबत 2011 मध्ये झाले होती. काही वर्षांनी त्यांना एक मुलगाही झाला. पती-पत्नी आणि मुलगा आनंदी जीवन जगत होते. एक दिवस हे दाम्पत्य आपल्या नातेवाईकाकडे लग्न समारंभात आले होते. या महिलेचा पती आपल्या मेहुणीसोबत डीजेवर डान्स करत होता. मात्र, ही बाब पत्नीला आवडली नाही. तिने त्याचवेळी पतीला चपलेने मारहाण केली. पत्नीच्या या कृतीनंतर पतीला खूप लाज वाटली आणि तो तिथून निघून गेला.
पोलीस सांगून लुटले तब्बल 103 कोटी रुपये, थेट एनकाऊंटर करण्याची द्यायचे धमकी, टोळीचे परदेशी कनेक्शन
पोलीस समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले प्रकरण -
पोलिस समुपदेशन केंद्रात, पतीने समुपदेशकाला सांगितले की, त्याला खूप दु:ख झाले आहे आणि तो आता आपल्या पत्नीला सोबत ठेवणार नाही. तर पत्नीचे म्हणणे आहे की, पती लग्नात माझ्या बहिणीसोबत डान्स करत होता. मी अनेक वेळा थांबण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ऐकले नाही. म्हणून मग रागाच्या भरात मी चप्पल मारली. दरम्यान, कौटुंबिक समुपदेशन केंद्रातील समुपदेशक सतीश खिरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला तिच्या मेहुणीशी बोलू नये असे सांगण्यात आले आहे. याला त्याने होकार दिला असून आता दोन्ही पती-पत्नीमध्ये तडजोडही झाली आहे.