हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @natkhatgang नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला बेडवर झोपली आहे. तिचा पती तिच्या अंगावर पांघरूण घालतो आणि धावत बाल्कनीत येतो. समोरच्या टेरेसवर पिवळी साडी घातलेली एक महिला आहे, जी त्यांची शेजारीण आहे. ती या व्यक्तीची वाट पाहत उभी आहे. शेजारणीला पाहताच व्यक्ती रोमँटिक होतो. बॅकग्राउंडमध्ये गाणं वाजत 'हम दो प्रेमी, छत के ऊपर'. हे गाणं दोघंही गातात आणि त्यावर नाचू लागतात. दोघंही जणू प्रेमीयुगुल आहेत असा डान्स करतात. दोघांची जुगलबंदी होते. नंतर असं काहीतरी घडतं, ज्याची अपेक्षा या दोघांनाही नसते.
advertisement
दोघंही गाण्यावर नाचत एकमेकांमध्ये गुंतले असताना व्यक्तीची झोपलेली बायको अचानक बाल्कनीत येऊन त्याच्या मागे उभी राहते आणि दोघंही घाबरतात. गाण्याचे सूरही लगेच बदलतात. ‘आदत अपनी छोड दे कहना मेरा मान ले’ हे गाणं मागे वाजू लागतं. यानंतर पत्नी काठी उचलते आणि पतीला बदडायला सुरुवात करते. शेजारी महिलाही लगेच मागे जाते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी तो मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. नटखट गँगचे प्रोफाईल पाहिल्यावर असे अनेक व्हिडिओ या लोकांनी शेअर केल्याचं आढळून आलं. पण पती-पत्नी आणि शेजारी यांचा हा व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर नक्कीच हसू येतं. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 कोटी 31 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर व्हायरल होत असलेल्या या मजेदार व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 93 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर 1 लाख 28 हजारांहून अधिक वेळा तो शेअर करण्यात आला आहे. याशिवाय सुमारे तीन हजार कमेंट्स आल्या आहेत.
व्हिडिओवर कमेंट करताना विनय मिश्रानं लिहिलं आहे की, याचा अर्थ असा आहे की महिला कितीही झोपल्या तरी त्या आपल्या पतींवर लक्ष ठेवणं थांबवू शकत नाहीत. प्रिया नावाच्या मुलीने कमेंट करून लिहिलं आहे की, भाऊ, तुमची पत्नी तुम्हाला चांगली ओळखते. म्हणूनच शेवटच्या गाण्याची ओळ अशी आहे. पण व्हिडिओ चांगला आहे.
सुंदर मुलगी पाहून वृद्धाचा पाय घसरला, सगळं काही विकलं, तंबूत राहण्याची आली वेळ
ब्रिजमोहन सिंहनं म्हटलं, व्हिडिओमध्ये किती सुंदर रोमँटिक सीन चालू होता. पत्नी येताच क्षणात सर्व काही बदलले. तर गुलजार नावाच्या व्यक्तीने तुमच्या बहुतांश व्हिडिओंमध्ये दोन्ही महिला दिसत आहेत. यापैकी तुमची पत्नी कोणती? दोघीही तुमच्या बायका आहेत का? असा प्रश्नही विचारला आहे. तर परवेज अन्सारी नावाच्या व्यक्तीने तुमची शेजारीण खरोखर चांगली आहे, असं म्हटलं आहे.