मीडिया रिपोर्ट्सनुसार, आफ्रिकेची रहिवासी असलेली क्रिस एका खास प्रकारच्या गोगलगायीची शेती करते. ज्याचे शेल सुमारे 10 इंच असतात. त्यांना आफ्रिकन लँड स्नेल्स म्हणतात. जर्मनीत राहणाऱ्या क्रिसला आपल्या मुलाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये असताना गोगलगायांमध्ये रस निर्माण झाला. तेव्हापासून तिने त्यांचं पालन करण्यास सुरुवात केली आणि यामुळे तिला सध्या कोणत्याही प्रकारचं काम करण्याची गरज नाही.
advertisement
आपल्या व्यवसायाबद्दल बोलताना तिने सांगितलं की, तिच्याकडील प्रत्येक गोगलगाय जगापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ही गोगलगाय प्रत्येकी 60 युरोपर्यंत आरामात विकली जाते. तिला हॉस्पिटलमध्येच गोगलगाय आवडायला लागली आणि मग तिने बाजारातून 60 युरोला एक गोगलगाय विकत घेतली.
हळूहळू लोकांना तिची ही गोगलगाय आवडू लागली आणि त्यामुळे तिच्या मनात त्याबद्दलची कल्पना आली आणि आज तिच्या खास प्रकारच्या 5000 अधिक गोगलगायी आहेत. तिच्या व्हिडिओंमध्ये ती अनेकदा लोकांना सांगते, की तिच्या या कल्पनेनं आज तिचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. एक काळ असा होता जेव्हा तिच्याकडे पैसेही नसायचे, पण आज तिच्या या कल्पनेमुळे तिच्याकडे इतके पैसे आहेत की ती आरामात जीवन जगत आहे. यासोबतच तिने या व्यवसायात तीन लोकांना कामावर ठेवलं आहे. ज्यांचा पगार कोणत्याही चांगल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यापेक्षा चांगला आहे.