व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला ऑनलाईन बाईक राइड बुक करते. बाईक ड्रायव्हर येतो आणि तो ओटीपी टाकतो. तेव्हा त्याला जिथं जायचं ते अंतर दिसतं जे फक्त 180 मीटर आहे. ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने तिला तिथपर्यंत सोडलं आणि विचारलं की तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला ना? यावर महिलेने हो हे ठिकाण अगदी बरोबर आहे असं सांगितलं.
advertisement
मुंबईच्या रिक्षावाल्याची कमाल! ना ऑटो चालवतो, ना भाड्याने देतो, तरी महिन्याला कमावतो 8 लाख, कसं काय?
फक्त एवढ्याशा अंतरासाठी राइड का बुक केली असं कारणही त्या ड्रायव्हरने महिलेला विचारलं. तेव्हा तिनं जे सांगितलं ते वाचून, ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. महिलेनं सांगितलं की तिला रस्त्यावरील कुत्र्यांची खूप भीती वाटते. ती त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. रायडरला कारण थोडं विचित्र वाटलं, पण त्याने तिला जिथं जायचं तिथं सोडलं. या छोट्या राईडचं भाडं फक्त 19 रुपये होतं.
@rohitvlogster या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावर अनेक मजेदार कमेंट्स केल्या. काहींनी महिलेच्या निर्णयाला विचित्र म्हटलं, तर काहींनी काहीही न बोलता मदत केल्याबद्दल ड्रायव्हरचं कौतुक केलं. एका युझरनं लिहिलं, "धन्यवाद भावा, एका मुलीला सुरक्षित वाटलं." दुसऱ्याने म्हटलं, "टेक्नॉलॉजीचा योग्य वापर!" कोणीतरी विनोदाने म्हटलं, "एकही कुत्रा दिसला नाही!"