मुंबईच्या रिक्षावाल्याची कमाल! ना ऑटो चालवतो, ना भाड्याने देतो, तरी महिन्याला कमावतो 8 लाख, कसं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mumbai Auto Driver Viral : ऑटो न चालवता दिवसाला हजारो आणि महिन्याला लाखो रुपये कमवणाऱ्या मुंबईतील या ऑटोवाल्याची स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
मुंबई : पैसे कमवण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. ऑटोचालकही जेव्हा ऑटोरिक्षा चालवतात तेव्हाच त्यांना भाड्याचे पैसे मिळतात. पण मुंबईतील एक असा रिक्षावाला जो ऑटो न चालवता पैसे कमवतो आहे. तेसुद्धा थोडेथोडके नव्हे तर तब्बल 8 लाख रुपये. वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? आता हे कसं काय शक्य आहे, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.
मुंबईतील या ऑटोवाल्याची स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. लेन्सकार्टचे उत्पादन प्रमुख राहुल रुपाणी यांनी लिंक्डइनवर या रिक्षावाल्याची स्टोरी शेअर केली आहे. ते स्वतः या रिक्षावाल्याला भेटले होते आणि त्याच्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार हा रिक्षाचालक मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर उभा असतो.
advertisement
रुपाणी यांनी पोस्टमध्ये दिलं आहे, 'हा ऑटो ड्रायव्हर महिन्याला 5-8 लाख रुपये कमावतो. त्याची ऑटो चालवत नाही. अॅप नाही, निधी नाही, तंत्रज्ञान नाही. फक्त दररोज तो ऑटो योग्य वेळी योग्य ठिकाणी पार्क करतो.
"मी या आठवड्यात माझ्या व्हिसाच्या अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर होतो, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलं की मी माझी बॅग आत घेऊन जाऊ शकत नाही. लॉकर नाहीत. तेव्हा फूटपाथजवळ असलेल्या एका ऑटोचालकाने मला हात दाखवला. तो म्हणाला 'सर, बॅग द्या, सुरक्षित ठेवेने. माझं रोजचं काम आहे. 1000 रुपये चार्ज आहे. तेव्हाच मला या माणसाचा व्यवसाय कळला", असं रुपाणी यांनी सांगितलं.
advertisement
तो नेमकं करतो काय?
तो त्याची ऑटो कॉन्सुलेटच्या बाहेर पार्क करतो. प्रति ग्राहक 1000 रुपयाने बॅग ठेवण्याची सेवा देतो. दिवसाला 20-30 ग्राहक मिळतात. म्हणजे दिवसाला 20-30 हजार रुपये आणि महिन्याला 5-8 लाख रुपये.
तो कायदेशीररित्या त्याच्या ऑटोमध्ये 30 बॅग ठेवू शकत नसल्यामुळे त्याने एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याशी भागीदारी केली आहे. ज्याच्याकडे जवळच एक लहान लॉकरची जागा आहे. बॅग तिथे जातात. कायदेशीर. सुरक्षित. कोणताही त्रास नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 05, 2025 4:21 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मुंबईच्या रिक्षावाल्याची कमाल! ना ऑटो चालवतो, ना भाड्याने देतो, तरी महिन्याला कमावतो 8 लाख, कसं काय?


