तेलंगणातील हे प्रकरण आहे. डिसेंबर 2013 मध्ये या कपलचं लग्न झालं. महिलेने सांगितल्यानुसार तिने दोनदा हनीमून केला. एकदा 2013 साली केरळमध्ये आणि दुसरा 2014 साली काश्मीरमध्ये. पण तिचा नवरा शारीरिक संबंध ठेवू शकला नाही, तो तिला खूश करू शकला नाही. त्यामुळे त्यांचं लग्न कधीच पूर्ण झालं नाही.
advertisement
तिने असाही युक्तिवाद केला की तिच्या पतीने त्याला रूमेटॉइड आर्थरायटिस आहे हे लपवलं होतं. ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होतं. हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत हे क्रूरतेचं आहे असा दावा केला. तिने 2017 मध्ये झालेल्या मेडिकल टेस्टचाही उल्लेख केला ज्यामध्ये तिचा पती वैवाहिक जीवनासाठी अयोग्य आणि मुलं जन्माला घालण्यास असमर्थ असल्याचं आढळलं.
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार तिने तेलंगणा उच्च न्यायालयात पती नपुंसक असल्याचं कारण देत घटस्फोट आणि 90 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे.
याची त्याला आणि त्याची याला, 2 मित्रांच्या बायकाच बदलल्या, पण कशा? कांड असा पोलीसही हैराण
महिलेच्या पतीने तिचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि लग्न कधीच पूर्ण झालं नाही या पत्नीच्या दाव्याचं खंडन केलं. त्याने तात्पुरत्या इरेक्टाइल डिसफंक्शनची कबुली दिली असली तरी उपचार केले असल्याचं त्याने सांगितलं. त्याने त्याच्या पत्नीसोबत अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवले होते, ज्यामध्ये दोन्ही हनीमूनचा समावेश होता. असं तो म्हणाला.
उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने म्हटलं की, पती वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ आहे, त्याच्या नपुंसकतेबद्दल किंवा त्याने लग्नात फसवणूक केल्याचा दावा करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. वैद्यकीय नोंदी आणि तिच्या स्वतःच्या वर्तनातून वेगळं दिसून येत असताना, लग्नाच्या पाच वर्षांनंतर पत्नी पती नपुंसक असल्याचा दावा करू शकत नाही.