घरात कोणाचा तरी मृत्यू झाला की लोक डान्स करणाऱ्या मुलींना रात्री नाचण्यासाठी बोलावतात. रात्री 9 ते पहाटे ५ या वेळेत या मुलींना नाचवलं जातं. या कामासाठी एका मुलीला 5 ते 6 हजार रुपये दिले जातात.
या कार्यक्रमांमध्ये आता बंदूकही झाडल्या जातात. नुकताच नालंदा जिल्ह्यात श्राद्धाचा कार्यक्रम झाला. यावेळी डान्सचा प्रोग्राम होता, त्यात बंदुकीच्या गोळ्या झा़डण्यात आल्या. ही गोळी एकाला लागली आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
advertisement
मुलाऐवजी मुलगी आवडली! लिंग बदलाची शस्त्रक्रिया पूर्ण होण्याआधीच तरुणीने तरुणीशी लग्न केलं, अन्...
मीडिया रिपोर्टनुसार अशाच कार्यक्रमात नाचणआऱ्या एका मुलीनं सांगितलं की, बिहारमध्ये आता लोक मृत्यूप्रसंगीही लोकांना नाचायला लावतात. बियर जवळ ठेवली जाते आणि त्याच्याबरोबर नृत्य देखील होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजल्यानंतर डान्स सुरू होतो. 12 वाजेपर्यंत बॉलीवूड गाण्यांवर डान्स होतो, त्यानंतर भोजपुरी गाणी सुरू होतात.
एका महिलेचे 2 नवरे, दोघांसोबत एकाच छताखाली राहते; सांगितली कशी आहे मॅरिड लाइफ
या नृत्य करणाऱ्या मुलींकडून कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी लेहेंगा-चोली किंवा शॉर्ट कपड्यांमध्ये यावं अशी मागणी केली आहे. पैसे देण्याच्या बहाण्याने ते मुलींना आपल्या मांडीवर बसवून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करतात. भोजपूर, औरंगाबाद, बांका, रोहताससह बिहारमधील अनेक भागात मृत्यूचे नृत्य करण्याचा हा ट्रेंड सातत्याने वाढत आहे.