एका महिलेचे 2 नवरे, दोघांसोबत एकाच छताखाली राहते; सांगितली कशी आहे मॅरिड लाइफ

Last Updated:

महिला तिच्या दोन्ही पतींसोबत एकाच घरात राहते. जेव्हा या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला तेव्हा काही वेळातच तो व्हायरल झाला.

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया
लखनऊ : एका पुरुषाच्या दोन बायका... अशी प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या एक अशी महिला चर्चेत आली आहे, जिचे दोन पती आहे. या महिलेने एकाच वेळी दोन पुरुषांशी लग्न केलं. लग्नानंतर ती एकाच छताखाली दोन्ही नवऱ्यांसोबत राहते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे, ज्यात तिनं तिचं दोन पतींसोबतचं मॅरीड लाइफ कसं आहे ते सांगितलं आहे.
भारतात लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. हिंदू पौराणिक कथांमध्ये लग्नाला सात जीवनांचे बंधन मानलं जातं. हिंदू धर्माच्या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला एकदाच लग्न करता येतं. पण उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने हे नियम झुगारून एकाच वेळी दोनदा लग्न केलं. एवढंच नाही तर ती महिला तिच्या दोन्ही पतींसोबत एकाच घरात राहते. जेव्हा या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला तेव्हा काही वेळातच तो व्हायरल झाला.
advertisement
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत या महिलेच्या शेजारी दोन पुरुष दिसत आहेत. हे दोघंही तिचे पती असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिच्या गळ्यात दोन मंगळसूत्र आहेत. तिने सांगितलं की ती प्रत्येक पतीचं नाव असलेलं वेगळं मंगळसूत्र गळ्यात घालते. ती दोघांसोबत एकाच घरात राहत असल्याचं ती म्हणाली. मग ती एकाच वेळी दोन पतींना कसा वेळ देते? असं तिला विचारण्यात आलं. यावर तिनं आपण अगदी आरामात उत्तर दिलं की मॅनेज करते.
advertisement
हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत महिलेवर टीका केली. अनेकांनी तिला अरमान मलिक म्हटलं. महिलेच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे हे कळू शकलेलं नाही. बहुतेकांनी प्रत्यक्षात महिलेची दोन लग्न झालेली नाहीत. तिघंही फक्त व्हायरल होण्यासाठी असं करत असल्याचं म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
एका महिलेचे 2 नवरे, दोघांसोबत एकाच छताखाली राहते; सांगितली कशी आहे मॅरिड लाइफ
Next Article
advertisement
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement