चुरुमध्ये राहणारी महिला, महिलेचं नाव निशा. तिचं लग्न 2015 मध्ये अनुपशहर येथील एका पुरूषाशी झालं होतं. परंतु लग्नाच्या काही वर्षांनीच तिच्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्या महिलेला दोन मुलं आहेत. पतीच्या मृत्यूनंतर ती माहेरी राजगडला गेली. त्यावेळी ती तिच्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला गेली, जिथं तिची भेट विनोद कुमारशी झाली.
advertisement
विनोद कुमार हा झुंझुनूमधील तामकोर गावचा रहिवासी आहे, पण तो सरदारशहरमध्ये राहतो आणि घर चालवण्यासाठी फेरीवाला म्हणून काम करतो. लग्नात भेट झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. महिलेने तिच्या कुटुंबाला तिच्या नात्याबद्दल सांगितलं. पण ते त्यांनी मान्य केलं नाही. कारण विनोद हा त्या महिलेच्या मामाचा मुलगा आहे आणि नात्यानं तिचा भाऊ आहे.
कुटुंबातील सदस्यांनी नकार देऊनही दोघंही मोबाईलवर बोलत राहिले. काही दिवसांपूर्वी महिलेने पुन्हा तिच्या कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचं कुटुंब त्यांच्या नात्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे ती तिच्या दोन्ही मुलांना तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून तिचा प्रियकर विनोद कुमारसोबत पळून ऋषिकेशला गेली. दोघंही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.
बॉयफ्रेंडशी फोनवर बोलताना टोकलं, बायकोने प्रायव्हेट पार्टच कापला, नवऱ्याचा मृत्यू
त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना परत येण्यासाठी दबाव आणला. यानंतर दोघंही सरदारशहरला आले, जिथं विनोद काम करायचा, पण कुटुंबातील सदस्य अजूनही त्यांच्या नात्याला विरोध करतात. याशिवाय ते दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देत आहेत. ज्याबद्दल महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.