TRENDING:

Viral News : या संपूर्ण गावात एकटी राहते महिला, कारण जाणून व्हाल चकित

Last Updated:

जगभरात लोक आपल्या मर्जीने कुठेही राहू शकतात. आपल्या आवडीच्या शहरात घर घेऊ शकतात. त्यामुळे कोणी कुठेही जगात राहू शकतं, आपलं नवं जग, आयुष्य बनवू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : जगभरात लोक आपल्या मर्जीने कुठेही राहू शकतात. आपल्या आवडीच्या शहरात घर घेऊ शकतात. त्यामुळे कोणी कुठेही जगात राहू शकतं, आपलं नवं जग, आयुष्य बनवू शकतं. मात्र कधी कोणत्या ठिकाणी एकच व्यक्ती राहत असल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाही ना? मात्र अशी एक महिला आहे जी संपूर्ण गावात एकटीच राहते. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण ही गोष्ट खरी आहे. महिला एकटी का आणि कुठे राहते याविषयी जाणून घेऊया.
या संपूर्ण गावात एकटी राहते महिला
या संपूर्ण गावात एकटी राहते महिला
advertisement

एकट्या राहणाऱ्या महिलेचं नाव जोसेट असं आहे. ती 65 वर्षांची आहे. महिला ज्या गावात राहते तिथे माणसांपेक्षा अधिक लांडगेच राहतात. ही महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

जोसेट फ्रान्समधील रोशेफोर्टचॅटयेथे राहते. ज्याला जग मिडल ऑफ नोव्हेअर देखील म्हणतात. द सन या इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, फ्रान्समध्ये 35,083 नगरपालिका आहेत, त्यापैकी सर्वात लहान नगरपालिका Rochefourchat आहे. जिथे फक्त जोसेट राहते. तेथील सर्वात लहान नगरपालिका Rochefortchat आहे. या गावात एक राजवाडा, एक जुने चर्च आणि कब्रस्तान, एक टेलिफोन बूथ आहे. ज्याचं काम आता थांबलं आहे. सरकारी रेकॉर्डवर विश्वास ठेवला तर या सर्व गोष्टी जोसेटच्या ताब्यात आहेत.

advertisement

मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावले, शाळेतील विचित्र सेक्युरिटी सिस्टिम पाहून पालकांना धक्का

2005 पासून जोसेट या गावात एकटीच राहते. आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की या जागेत इतकं काय खास आहे की जोसेटला हे ठिकाण खूप आवडतं. जोसेट सांगते की तिला शांततेत आणि अज्ञातात राहायला आवडते. यामुळेच तिला या निर्जन गावात एकटे राहणं आवडतं. तिच्या गरजेनुसार तिनं आपल्या घरात सोलर पॅनल बसवले आहेत, जेणेकरून तिची विजेची गरज भागवता येईल. या विचित्र निर्णयामुळे तिला खाण्या-पिण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचेच्या विकरांवर गुणकारी, घरीच बनवा सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक साबण, Video
सर्व पहा

जोसेटला गावापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात जावं लागतं. जोसेट सांगते की, तिचे कुटुंबीय तिला भेटायला येतात आणि मग ते सगळे एकत्र शिकारीला जायचे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ती म्हणाला की मी त्याच्या आयुष्यावर खूप आनंदी आहे. त्यांच्याबद्दल कोणी काय विचार करेल याची पर्वा नाही. जोसेटविषयी ही माहिती समोर येताच सोशल मीडिावर चर्चा रंगलीय.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Viral News : या संपूर्ण गावात एकटी राहते महिला, कारण जाणून व्हाल चकित
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल