मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावले, शाळेतील विचित्र सेक्युरिटी सिस्टिम पाहून पालकांना धक्का
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये नियम अटी असतात. आपल्या मुलांना सुरक्षित शाळा, कॉलेजमध्ये घालावे असं प्रत्येकच पालकांना वाटतं त्यामुळे सेक्युरिटी सिस्टिम असलेल्या ठिकाणी ते आपल्या मुलांचा दाखला करतात.
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये नियम अटी असतात. आपल्या मुलांना सुरक्षित शाळा, कॉलेजमध्ये घालावे असं प्रत्येकच पालकांना वाटतं त्यामुळे सेक्युरिटी सिस्टिम असलेल्या ठिकाणी ते आपल्या मुलांचा दाखला करतात. मात्र अनेक शाळा, कॉलेजमध्ये विचित्र प्रकारची सेक्युरिटी सिस्टिम, अटी, नियम असतात. अशी एक शाळा आहे जिथे मुलींच्या टॉयलेटमध्येही कॅमेरे बसवले आहेत. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. ही शाळा नेमकी कोणती आहे आणि इथे काय सेक्युरिटी सिस्टिम आहे याविषयी जाणून घेऊया.
मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे बसवल्याचं प्रकरण रशियातील बोलशोय कामेन भागातील एका शाळेतून समोर आलंय. या शाळेतील सेक्युरिटी सिस्टिम एवढी कडक आहे की येथील बाथरुममध्येही विद्यार्थ्यांना गोपीनियता नाही.
शाळेनं असा दावा केला आहे की, हे कॅमेरे टॉयलेटच्या बाहेर बसवण्यात आले आहेत. कॅमेऱ्यात टॉयलेटच्या आतील दृश्य दिसत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कॅमेरे फक्त मुलींच्या टॉयलेट बाहेर लावले आहेत मुलांच्या नाही.
advertisement
मुलींच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेऱ्यांची गरजच काय, असा प्रश्न शाळा प्रशासनाला विचारला जात होता. त्यांनी सांगितलं की टॉयलेट बूथमधील कॅमेरे मुले भांडणे, धुम्रपान किंवा अशी कोणतीही कृती करू नयेत यासाठी लावले आहेत. या बूथवर लक्ष ठेवले जात नाही, त्यामुळे गोपनीयतेला धोका नसल्याचं ते या संदर्भात अद्याप कोणतीही रीतसर तक्रार आलेली नसली तरी पोलिसांनी तपास सुरू केला नसून प्रसारमाध्यमांमध्ये याची जोरदार चर्चा होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 01, 2023 12:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावले, शाळेतील विचित्र सेक्युरिटी सिस्टिम पाहून पालकांना धक्का








