Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा राडा, तरुणीने व्यक्तीच्या कानाखाली मारली
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दिल्ली मेट्रोमधील अनेक निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. वाद, भांडण, हाणामारी, डान्स, मॉडेलिंग, असे विविध प्रकराचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात.
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : दिल्ली मेट्रोमधील अनेक निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. वाद, भांडण, हाणामारी, डान्स, मॉडेलिंग, असे विविध प्रकराचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. असाच आणखी एक मेट्रोतील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुणी आणि एका व्यक्तीचं जोरदार भांडण झालं. भरमेट्रोत गर्दीमध्ये दोघांमध्ये मोठं भांडण झालं असून हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एक मुलगी आणि एक व्यक्ती मोठमोठ्याने मेट्रोमध्ये भांडताना दिसले. कोणीतरी यांच्या भांडणाचा व्हिडीओ काढला असून आता तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. असे भांडणाचे व्हिडीओ सतत इंटरनेटवर फिरत असतात.
advertisement
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तरुणीने भांडणात व्यक्तीच्या कानाखाली मारली. व्हिडिओमध्ये एक महिला सीटवर बसलेली दिसत आहे, तर दुसरी मुलगी व्यक्तीच्या समोर उभी आहे. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण होतं. दिल्ली मेट्रोमध्ये आता हे सर्व प्रकार सामान्य झाले आहेत कारण सतत अशा घटना घडत असतात. नेमकं कोणत्या प्रकरणावरुन दोघांचं भांडण झालं हे स्पष्ट झालं नाही.
advertisement
its_faisal_no1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ काही वेळातच इंटनेटर व्हायरल झाला असून भरपूर कमेंटही पहायला मिळत आहेत. अनेकांनी अशा घटनांवर संताप व्यक्त केला असून कारवाई करण्याचीही मागणी पोलिसांकडे केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 01, 2023 11:11 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा राडा, तरुणीने व्यक्तीच्या कानाखाली मारली









