TRENDING:

दोनदा लग्न केलं तरी व्हर्जिन राहिली महिला, तिसऱ्यांदा लग्नाआधीच रोमान्स केला अन् घडलं असं की...

Last Updated:

Relationship news : एक दुर्दैवी स्त्री जी दोनदा पत्नी झाली पण दोन्ही पतींकडून पत्नी होण्याचं सुख तिला मिळाले नाही. तिसऱ्यांदा तिने विवाहपूर्व प्रेमसंबंध निर्माण केले, पण...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लग्नानंतर 2 जीव एक होतात. त्यातून नव्या जीवाची निर्मिती होते. पण एक अशी महिला जिने एक नाही दोन लग्न केली. तरी ही महिला व्हर्जिन राहिली. वयाच्या पन्नाशीत या महिलेने तिसरं लग्न करायचं ठरवलं. पण यावेळी तिसऱ्या लग्नाआधी तिने रोमान्स केला. त्यानंतर असं घडलं की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
News18
News18
advertisement

या महिलेचं नाव मारिया-लुईस वॉर्न आहे, ती आता 68 वर्षांची आहे. मारियाने दोनदा लग्न केलं. पण काही अटी आणि निराशेमुळे ती कुमारी राहिली. त्यानंतर वयाच्या 51व्या वर्षी तिने लग्न न करता तिसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध जोडले. पण नंतर तिच्या आयुष्यात असं काही घडलं की तिचा तिसरा जोडीदारही तिच्यापासून दूर गेला. आता, वयाच्या 68 व्या वर्षी ती एकाकी जीवन जगत आहे.

advertisement

पहिल्या लग्नानंतर काय घडलं?

मारियाचं पहिलं लग्न वयाच्या 1977 मध्ये 18 व्या वर्षी जॉन नावाच्या माणसाशी झालं होतं, जो तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. लग्नानंतर हनीमूनच्या वेळी जॉनला कळलं की मारियाला मासिक पाळी येत आहे, म्हणून त्याने कोणत्याही प्रकारची शारीरिक जवळीक ठेवण्यास नकार दिला. एवढंच नाही तर कॅथोलिक धर्माचा अनुयायी जॉनचं मत होतं की शारीरिक जवळीक फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी असते. 18 वर्षांची असताना मारियाला मुलं नको होती. म्हणूनच दोघांनी कधीही प्रेमसंबंध निर्माण केले नाहीत. 3 वर्षांनंतर दोघंही वेगळे झोपू लागले आणि पाच वर्षांनी 1982 मध्ये त्यांचं लग्न मोडलं.

advertisement

Mahabharat : सुंदरी जिनं अर्जुन आणि त्याच्या बाबांवरही टाकले 'डोरे', कुणाशी केलं लग्न?

दुसऱ्या लग्नानंतर कसली अडचण?

यानंतर मारियाचं दुसरं लग्न कॅरोल नावाच्या पुरुषाशी झालं, जो तिच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठा होता. कॅरोलला त्याच्या पहिल्या लग्नापासून दोन मुलीही होत्या. या लग्नानंतर मारियाला स्वतःचं मूल हवं होतं, पण कॅरोलने नकार देत म्हटलं की मी माझ्या मुलींना वचन दिलं आहे की मला आणखी मुलं होणार नाहीत. यानंतर कॅरोलची तब्येतही बिघडू लागली. अशा परिस्थितीत, 2005 मध्ये कॅरोल मारियाला सोडून आपल्या मुलींकडे गेला. मारिया पुन्हा एकटी होती.

advertisement

तिसऱ्यांदा लग्नाआधीच रोमान्स केला पण...

मारियाचं पहिलं लग्न 5 वर्षे आणि दुसरं लग्न 23 वर्षे टिकले. यानंतर टिम नावाच्या एका फ्रेंच डॉक्टर मारियाच्या आला. कॅरोलवर उपचार करणारा हा डॉक्टर होता. मारियाने त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते मित्र बनले. त्यानंतर 2005 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. मारिया म्हणाली, जेव्हा टीमने तिला किस केलं तेव्हा तिला पहिल्यांदाच खोल प्रेम वाटलं. टिमच्या घरी जेवणानंतर दोघे बेडरूममध्ये जातात आणि त्यांची अनेक महिन्यांपासूनची केमिस्ट्री अखेर एका जादुई रात्रीत बदलते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आनंदाने हसत होती, कारण हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण होता. तिला टिमसोबत पहिल्यांदाच प्रेमसंबंधांचा अनुभव आला. वयाच्या 51 व्या वर्षी तिला नेहमीच हव्या असलेल्या प्रेमाची खोलीही कळली.

advertisement

Chanakya Niti : या वेळेला नवरा-बायकोने अंथरुण सोडावंच, नाहीतर..., चाणक्यनीतीत सांगितलेत वाईट परिणाम

पण या 12 वर्षांच्या नात्यात टिमने वारंवार फसवणूक केली. टिमचे अनेक महिलांशी संबंध होते. अशा परिस्थितीत कोविड काळात एके दिवशी तो मारियाला सोडून निघून गेला. यानंतर त्याने तिच्या तब्येतीची विचारपूसही केली नाही. अशा परिस्थितीत मारिया पुन्हा एकदा एकटी पडली.

शेवटी एकटीच राहिली महिला

वयाच्या 68 व्या वर्षी मारिया आता तिच्या तीन कुत्र्यांसह एकटीच राहत आहे. ती म्हणते, "प्रेमाचे ते क्षण चांगले होते. पण त्यांनी मला कमकुवत बनवलं. आता मी पुन्हा असा धोका पत्करणार नाही. ज्यांना वाटतं की प्रेमसंबंध लवकर सुरू झाले पाहिजेत, त्यांना मी सांगू इच्छिते की घाई नाही. मी 51 वर्षे वाट पाहिली आणि जरी टिमने माझे मन तोडलं तरी मला कोणताही पश्चात्ताप नाही."

सोशल मीडियावर महिलेची कहाणी ऐकल्यानंतर, लोकांना आश्चर्य वाटतं की इतकी वर्षे रोमँटिक न होता कोणी कसं जगू शकतं. एका युझरने लिहिलं, "51 वर्षे वाट पाहणं? हे अविश्वसनीय आहे" काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं, "दोन लग्नांमध्ये इतका संयम आणि नंतर टिमसारख्या पुरूषाला सहन करणं. तू खूप हिंमतवान आहे", अशी कमेंट एकाने केली आहे.

मराठी बातम्या/Viral/
दोनदा लग्न केलं तरी व्हर्जिन राहिली महिला, तिसऱ्यांदा लग्नाआधीच रोमान्स केला अन् घडलं असं की...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल