गोला कुआन परिसरात ही घटना घडली. ज्वेलर्स मुकेश सोनी पत्नी प्रियांशासोबत राहत होते. त्यांना दोन मुली आहेत. मुकेशने रडत रडत घटनेबद्दल सविस्तर सांगितलं. तो म्हणाला की, माझी पत्नी खूप मोठी भक्त होती. चैत्र नवरात्रीत माता राणीची पूजा आणि उपवास करण्याची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. नवरात्रीपूर्वी त्याने मंदिर स्वच्छ केलं. घरातील प्रत्येक खोली स्वच्छ केली. 29 मार्च रोजी घरी पूजा साहित्य मागवलं होतं.
advertisement
पण नवरात्र सुरू होण्याच्या आदल्या रात्री प्रियांशाला मासिक पाळी आली. 30 मार्च रोजी सकाळी जेव्हा तिला हे कळलं तेव्हा ती दुःखी झाली. तिने मला मासिक पाळीबद्दल सांगितलं. आजपासून नवरात्र सुरू होत आहे आणि मला मासिक पाळी आली आहे. मी माता राणीची पूजा कशी करणार, माझ्यासोबत असं का घडलं? असं ती म्हणू लागली. मी तिला समजावलं ही ही एक सामान्य गोष्ट आहे. हे सर्व महिलांसोबत घडते. यात दुःखी होण्यासारखे काही नाही. हे बोलून मी माझ्या दुकानात गेलो.
डॉक्टरचं भयानक कृत्य! चोरायचा महिलांच्या शरीराचा खास अवयव आणि...
पती मुकेश म्हणाला, 'मी तिला सांत्वन दिल्यानंतरही प्रियांशाचं दुःख कमी झालं नाही. तिने दुपारी ३ वाजता मला फोन केला आणि घरी बोलावले. घरी पोहोचताच ती पुन्हा रडू लागली, पूजा आणि उपवास करू शकत नाही, मला बरं वाटत नाही असं म्हणू लागली.. मी तिला पुन्हा समजावून सांगितलं. पुढच्या वेळी उपवास कर म्हणालो आणि मी पुन्हा दुकानात गेलो.
सायंकाळी 5 वाजता तिनं विषारी पदार्थ घेतला. मी ताबडतोब तिला मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन गेलो. 31 मार्च रोजी ती घरी परतली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात नेलं. पण 1 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला.
खैनीची शौकीन गर्लफ्रेंड, मळण्याच्या स्टाईलवर फिदा बॉयफ्रेंड, दिलं असं गिफ्ट की..., VIDEO VIRAL
सीओ सिटी स्नेहा तिवारी म्हणाल्या की, महिलेने विष घेतलं होतं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जात आहे.