सहा वर्षांपूर्वी सदर परिसरात एका मुलीचा विवाह झाला होता. इतक्यात एक तरुण तिच्या सासरच्या घरी भाड्याने खोली घेऊन राहू लागला. आधी सून आणि भाडेकरू यांच्यात मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. लवकरच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आता सुनेचे तिच्या सासरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू प्रियकराशी अनैतिक संबंध सुरू झाले होते. सुनेने आपल्या पाच वर्षांच्या निरागस मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केल्याचा आरोप आहे. रात्रीच ती भाडेकरूच्या खोलीत गेली.
advertisement
सासूला आला सुनेवर संशय, चेकअप केल्यावर समजलं असं सत्य की नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली!
रात्री सासूला जाग आली तेव्हा सून आपल्या खोलीत नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी सुनेचा शोध सुरू केला. शोध घेत असताना सासू भाडेकरूच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा तिला थोडा संशय आला. सासूने दार उघडले असता तिला एकाच खोलीत भाडेकरू आणि तिची सून दिसली. हे दृश्य पाहून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. सासूने सुनेची तक्रार तिच्या आईकडे केली, मात्र तिने त्याऐवजी सासूलाच खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.
मात्र, या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सासूने सदर पोलीस ठाण्यात केली. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी आता सून, भाडेकरू आणि सुनेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
