सासूला आला सुनेवर संशय, चेकअप केल्यावर समजलं असं सत्य की नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
उत्तर प्रदेशातल्या कन्नौजमध्ये एका महिलेची एका कुटुंबानं फसवणूक केली आहे. तृतीयपंथीय व्यक्ती मुलगी असल्याचं सांगून तिचं लग्न पीडित महिलेच्या मुलाशी लावून देण्यात आलं. जेव्हा पीडितेला तिची सून तृतीयपंथीय असल्याचं समजलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातल्या कन्नौजमध्ये एका महिलेची एका कुटुंबानं फसवणूक केली आहे. तृतीयपंथीय व्यक्ती मुलगी असल्याचं सांगून तिचं लग्न पीडित महिलेच्या मुलाशी लावून देण्यात आलं. जेव्हा पीडितेला तिची सून तृतीयपंथीय असल्याचं समजलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. विशेष म्हणजे पीडितेला मुलाच्या लग्नाच्या 5 वर्षांनंतर तिची सून तृतीयपंथीय असल्याची माहिती मिळाली. यानंतर भांडण झालं व पीडितेची सून माहेरी निघून गेली. त्यानंतर पीडितेच्या सुनेनं सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पीडित महिलेनं पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून दाद मागितली आहे.
फसवणूक करून तृतीयपंथीय लग्न लावून देण्याचं प्रकरण कन्नौजमधल्या तिरवा कोतवाली भागातल्या रजईमऊ ठकुराइन गावातील आहे. तिथल्या बानोनं तिचा एकुलता एक मुलगा शानू याचं लग्न कानपूर परिसरातल्या अटियारायपूर गावातली रहिवासी असलेल्या साहिद याची मुलगी रोशनी हिच्यासोबत 2018मध्ये लावलं होतं. लग्नानंतर पाच वर्षं रोशनीनं आजारपणाचं कारण सांगून पतीपासून अंतर ठेवलं. परंतु काही महिन्यांपूर्वी शानूला समजलं की, त्याची पत्नी तृतीयपंथीय आहे. ही गोष्ट त्याने त्याच्या आईला सांगितली.
advertisement
शानूच्या आईने तिची सून रोशनीची तपासणी एका नर्सकडून करून घेतली असता तिची सून तृतीयपंथीय असल्याचं समोर आलं. त्यानंतर रोशनीचे तिचा पती आणि सासूसोबत वाद झाले व ती माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर रोशनीनं पती आणि सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू करताच शानूच्या आईनं पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसंच सत्य बाहेर यावे, यासाठी सुनेची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही केली.
advertisement
पीडित महिला म्हणाली...
या प्रकरणी पीडित महिला बानो हिने पोलिसांना सांगितलं, की 'माझी सून तृतीयपंथीय आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिलं आहे. मी या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन माहिती दिली आहे. माझ्या सुनेचं नाव रोशनी असून तिच्यासोबत माझ्या मुलाचं लग्न 16 नोव्हेंबर 2018 रोजी झालं होतं. सून तृतीयपंथीय असल्याचं कळताच आम्ही तिच्या कुटुंबीयांना कळवलं; पण त्यांनी येऊन आम्हालाच मारहाण केली व ते माझ्या सुनेला सोबत घेऊन गेले. आता सुनेनं आमच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल केलाय. आम्हाला न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे.’
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 01, 2024 11:51 PM IST
मराठी बातम्या/देश/
सासूला आला सुनेवर संशय, चेकअप केल्यावर समजलं असं सत्य की नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली!


