Weather Alert : महाराष्ट्रातून एक्झिट नाहीच! विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
4 नोव्हेंबर रोजीही राज्यातील हवामानात विविधता पाहायला मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
1/7
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत संमिश्र वातावरण बघायला मिळत आहे. 4 नोव्हेंबर रोजीही राज्यातील हवामानात विविधता पाहायला मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भात कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट असल्याचं हवामान विभागाच्या वेबसाईटवर दिसून येत आहे. पाहुयात 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान 32 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याचा अंदाज आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे. पुण्यातील कमाल तापमान सुमारे 29 अंश आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर परिसरात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंशांपर्यंत असू शकतं.

5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हवामान विभागाने हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.

6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. या भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी दिवसभर उन्हाचे चटके कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.

7/7
एकूणच, 4 नोव्हेंबर रोजी राज्यात संमिश्र हवामान अनुभवायला मिळणार आहे. राज्यातील बहुतेक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी आकाश ढगाळ राहून वातावरणात गारवा जाणवू शकतो. तर विदर्भात कोरडे आणि उष्ण वातावरण कायम राहील.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement