VIDEO : 'लेडी सेहवाग' रिचाची फिरकी घ्यायला गेली अन् ऑस्ट्रेलियन खेळाडू तोंडावर आपटली, जेमीमाने सांगितला मैदानातला ड्रामा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आजपासून वुमेन्स प्रिमियर लीगला सूरूवात होणार आहे. या लीगआधी दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन जेमिमा रॉड्रीग्जचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जेमीमा रॉड्रीग्जने मैदानावरचा किस्सा सांगितला आहे.
Jemima Rodrigues : आजपासून वुमेन्स प्रिमियर लीगला सूरूवात होणार आहे. या लीगआधी दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन जेमिमा रॉड्रीग्जचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जेमीमा रॉड्रीग्जने मैदानावरचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा पाहून खूपच भयानक आहे.
सोशल मीडियावर जेमीमा रॉड्रीग्जचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता आणि क्रिकेट प्रेझेंटर गौरव कपूरने जेमीमा रॉड्रीग्जची मुलाखत घेतल्याचे समजते. या मुलाखतीत जेमीमा रॉड्रीग्जने मैदानावरचा एक किस्सा सांगितला आहे.
रिचा घोष आणि मी मैदानावर फलंदाजी करत होतो. त्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या विकेटकिपर एलीसा हिलीने रिचा घोषची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यावेळेस झालं असं की आम्ही दोघी फलंदाजी करत असताना एकमेकांशी बोलत होतो आणि एकमेकांना सल्ले देत होतो. रिचा ज्या ज्या वेळेस चांगला शॉर्ट मारायची यावेळेस मी तिच्या खेळीचे कौतुक करायचे. आमच्यातलं ही संवादाची गोष्ट पाहून अॅलिसा हिलीने रिचाला सांगितल, जा तुझी मम्मी (जेमी) बोलवतेय, ती काय बोलते आहे, ते ऐकूण ये, असे म्हणत अॅलिसा हिलीने दोन्ही खेळाडूंची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
Richa Ghosh I wasn’t aware of your game😭🔥 pic.twitter.com/WhYyfpcJd3
— Siya (@siyaagrawal18) January 8, 2026
या घटनेनंतर दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर रिचा घोषणे स्केवर कट मारला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. यानंतर रिचाने मागे वळून,माझ्या आईने मला फोर मारायला सांगितला,असे सांगत तिने अॅसिला हेलीला तिच्याच शब्दात खणखणीत उत्तर दिल्याचे जेमीमा रॉड्रीग्जने सांगितले.
advertisement
दरम्यान आजपासून वुमेन्स प्रिमियर लीगला सूरूवात होत आहे. या लीगमधला पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरू या दोन संघात रंगणार आह.नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सूरूवात होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 4:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'लेडी सेहवाग' रिचाची फिरकी घ्यायला गेली अन् ऑस्ट्रेलियन खेळाडू तोंडावर आपटली, जेमीमाने सांगितला मैदानातला ड्रामा











