Dombivli: डोंबिवलीत 'रात्रीस खेळ चाले', एकाच भागात लागोपाठ 4 घटना, दुकानादारांमध्ये घबराट
- Published by:Sachin S
 
Last Updated:
चोरट्यांचा कारनामा झेरॉक्स दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
डोंबिवली : डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  डोंबिवली पूर्वे भागामध्ये एकाच रात्री लागोपाठ चार दुकानं फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. पण तरी पोलिसांचा धाक उराला की नाही, असा सवाल दुकानदारांनी उपस्थितीत केला आहे. चोरट्यांचा कारनामा झेरॉक्स दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पूजा साहित्याची विक्री करणारे प्रशांत सखाराम खाडे (५०) यांनी पुढाकार घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.  शनिवारी १ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ ते रविवारी सकाळी ६.३६ दरम्यानच्या कालावधीत या चोरीच्या घटना घडल्या.
advertisement
प्रशांत खाडे यांच्या मालकीचे छेडा रोडला कुवर बाग सोसायटीच्या तळमजल्यावर गणेश सुंगधी भंडार आणि झेरॉक्स सेंटर आहे. या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ३ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. याच दुकानाच्या शेजारी ल. कृ. पारेकर गुरूजींचे दुकान फोडले. मात्र चोरट्यांचा हाती काही लागलं नाही. दिनेशकुमार भैराराम चौधरी (३९) यांच्या मालकीचे न्यू शुगर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानाचे लोखंडी शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
advertisement
तर, संतोष साळे (३८) यांचे करिअर इन्फोटेक नावाचे कॉम्प्युटर क्लासेस आहे. त्यांच्या क्लासेसचे लोखंडी शटर अर्धे उघडून चोरट्यांनी २ हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. डोंबिवली मधील पोलीस नक्की काय करतात असा सवाल उपस्थिती केला असून पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
advertisement
ग्रामीण भागातील सुपर मार्केट साफ
view commentsतर काटई-बदलापूर पाईप लाईन क्रॉस तळोजा रोडला असलेल्या खोणी फाट्यावर पटेल आर मार्ट नामक सुपर मार्केट आहे. या दुकानात मॅनेजर म्हणून नोकरी करणारे चेतन सुरेश भोईर (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मानपाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री सव्वादहा वाजता चेतन भोईर हे दुकान बंद करून घरी गेले. सोमवारी सकाळी जेव्हा दुकान उघडले तेव्हा दुकानातील सामान अस्ताव्यस्त विखुरलेले आढळून आले. सदर दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या टॉयलेटच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडली. त्यानंतर चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून रोख रकमेसह अन्य साहित्य मिळून १ लाख २८ हजार १५३ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
November 03, 2025 11:54 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli: डोंबिवलीत 'रात्रीस खेळ चाले', एकाच भागात लागोपाठ 4 घटना, दुकानादारांमध्ये घबराट


