IND vs SA Final : मैदानात एकटीच लढली, भिडली आणि रडली,पण मुंबईच्या क्रिकेट फॅन्सनी तिच्या ओठावर आणलं हसू, VIDEO

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेकडून तिने फायनल सामन्यात एकाकी झुंज दिली. ही तिची झुंज पाहूनच भारतीय क्रिकेट फॅन्सही वेडे झाले होते. त्यामुळे भारतीय फॅन्सनी तिला स्टॅडींग ओव्हेशन देऊन तिला खास निरोप दिला आहे.

 south africa captain laura wolvaardt
south africa captain laura wolvaardt
IND vs SA Final : भारताच्या महिला संघाने वुमेन्स वर्ल्ड कपवर नाव कोरून इतिहास रचला आहे. या विजयानंतर टीम इंडियाच्या महिला क्रिकेटरचे कौतुक होत आहे. हे कौतुक होत असताना साऊथ आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डला ही विसरून चालणार नाही.कारण दक्षिण आफ्रिकेकडून तिने फायनल सामन्यात एकाकी झुंज दिली. ही तिची झुंज पाहूनच भारतीय क्रिकेट फॅन्सही वेडे झाले होते. त्यामुळे भारतीय फॅन्सनी तिला स्टॅडींग ओव्हेशन देऊन तिला खास निरोप दिला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर भारताने दिलेल्या 298 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे एका मागून एक विकेट पडत होते. त्याचवेळी लॉरा वोल्वार्ड एका बाजूने दक्षिण आफ्रिकेची बाजू भक्कम धरून होती. ती जेव्हा मैदानात होती तिथपर्यंत टीम इडियाच्या खेळाडूंमध्ये भितीचे वातावरण होते.कारण ज्याप्रमाणे तिने मागील सामने खेळले आहेत ते पाहता ती मॅच कोणत्याही क्षणी पालटू शकली असती.
advertisement
advertisement
दरम्यान दिप्ती शर्माच्या बॉलवर वोल्वार्डने मोठा शॉर्ट खेळला होता.हा बॉल इतका उंचावर होता की कॅच पकडणे खूपच अवघड होते. पण अमनज्योतने पहिल्या प्रयत्नात बॉल पकडताना उडाला, दुसऱ्यांदाही तेच झालं पण तिसऱ्यांदा तिने कॅच पडकली आणि भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारी व्होल्वार्ड 101 धावांवर आऊट झाली. ही कॅच पाहताना सर्व भारतीयांचा श्वास रोखला होता.
advertisement
ही कॅच घेताना भारताची सामन्यावर पकड आली नंतर भारताने आफ्रिकेचे इतर खेळाडू आऊट करून फायनल जिंकली.दरम्यान या पराभवानंतर साऊथ आफ्रिकेच्या डोळ्यात अश्रू होते. त्याचवेळी भारतीय क्रिकेट फॅन्सनी तिच्या फाईटींग स्पिरीटची दखल घेऊन तिला स्टॅडींग ओव्हेशन देऊन वेल प्लेड लॉरा अशा घोषणाबाजी देऊन तिच्या खेळीचे कौतुक केले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : मैदानात एकटीच लढली, भिडली आणि रडली,पण मुंबईच्या क्रिकेट फॅन्सनी तिच्या ओठावर आणलं हसू, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement