Team India : 14 वर्षात 2 वर्ल्ड कप... धोनीसोबत घडलेल्या 5 गोष्टी हरमनसोबतही तशाच घडल्या, Gods Plan का योगायोग?

Last Updated:

टीम इंडियाने 2011 साली पुरुषांचा वनडे वर्ल्ड कप जिंकला, यानंतर आता 2025 मध्ये भारताने महिला वनडे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे.

14 वर्षात 2 वर्ल्ड कप... धोनीसोबत घडलेल्या 5 गोष्टी हरमनसोबतही तशाच घडल्या, Gods Plan का योगायोग?
14 वर्षात 2 वर्ल्ड कप... धोनीसोबत घडलेल्या 5 गोष्टी हरमनसोबतही तशाच घडल्या, Gods Plan का योगायोग?
मुंबई : टीम इंडियाने 2011 साली पुरुषांचा वनडे वर्ल्ड कप जिंकला, यानंतर आता 2025 मध्ये भारताने महिला वनडे वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. या दोन्ही ऐतिहासिक विजयांमध्ये 14 वर्षांचं अंतर आहे, पण दोन्ही वर्ल्ड कप फायनलमध्ये पाच गोष्टी अशा घडल्या ज्या अगदी सारख्याच होत्या, त्यामुळे याला योगायोग म्हणावं का आणखी काही? 2011 मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर आता 2025 मध्ये भारतीय महिला टीमने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात विजय मिळवला.

मुंबई दोन्ही वर्ल्ड कप विजयाची साक्षीदार

2011 आणि 2025 वर्ल्ड कपच्या विजयाची साक्षीदार मायानगरी मुंबई बनली. 2011 पुरुष वर्ल्ड कपची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवली गेली, तर 2025 महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर झाला.

दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनल 2 तारखेला

दोन्ही वर्ल्ड कप फायनलच्या तारखाही 2 तारखेलाच खेळवल्या गेल्या. 2011 वर्ल्ड कपची फायनल 2 एप्रिलला तर 2025 वर्ल्ड कपची फायनल 2 नोव्हेंबरला खेळवली गेली.
advertisement

ऑलराऊंडर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट

2011 आणि 2025 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार ऑलराऊंडरला मिळाला. 2011 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आलं. तर 2025 मध्ये दीप्ती शर्माला हा किताब देण्यात आला.

कॅप्टननेच संपवली फायनल

उल्लेखनीय बाब म्हणजे 2011 आणि 2025 च्या वर्ल्ड कपची फायनल भारतीय कॅप्टनच्या हातूनच संपली. 2011 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धोनीने सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. 2025 मध्ये टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने शेवटचा कॅच पकडून भारताचा विजय निश्चित केला.
advertisement

तिसऱ्या फायनलमध्ये खेळताना ट्रॉफी

2011 मध्ये भारतीय पुरुष टीमने 1983 आणि 2003 नंतर तिसरी वर्ल्ड कप फायनल खेळली. त्याचप्रमाणे 2025 मध्ये महिला टीमनेही तिसरी वनडे वर्ल्ड कप फायनल खेळली. याआधी 2005 आणि 2017 सालीही भारतीय महिला टीम वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 14 वर्षात 2 वर्ल्ड कप... धोनीसोबत घडलेल्या 5 गोष्टी हरमनसोबतही तशाच घडल्या, Gods Plan का योगायोग?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement