सकाळी ही महिला ज्योतिषाकडे गेली तेव्हा तिला त्याने तिच्याकडे लवकरच खूप पैसा येणार असं सांगितलं. काय आश्चर्य त्याच रात्री महिलेचं नशीब फळफळलं. ज्योतिषीनं केलेली भविष्यवाणी खरी ठरली. महिलेला कोट्यवधी रुपये मिळाले. ती करोडोंची मालकीण झाली.
अमेरिकेच्या मिशिगनमधील ही महिला. टॅरोट कार्ड सेशनसाठी गेली होती. तिनं सांगितलं की टॅरोट रिंडिंगनंतर तिला लवकरच तिच्याकडे खूप पैसा येणार असल्याचं सांगण्यात आलं. पण ते कसं शक्य आहे, याचा विचार ही महिला करतच होती. रात्री घरी आल्यानंतर ती कोट्यवधी रुपयांची मालकीण झाली.
advertisement
'तुम्ही कोरोना लस घेतली का?', उत्तर देण्याआधी हे वाचाच, नाहीतर फसाल
कसा झाला चमत्कार?
महिला जेव्हा ज्योतिषीकडे जात होती तेव्हा तिनं रस्त्यानं चालता चालता एक काम केलं. तिनं एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. कधी ना कधी आपल्याला लॉटरी लागेल अशी आशा तिला होती. यावेळीही तिकीट खरेदी करताना आपल्याला लॉटरी लागेल असं तिला वाटलं होतं. रात्री घरी पोहोचल्यानंतर तिनं आपलं लॉटरीचं तिकीट स्क्रॅच केलं. ती थोडेथोडके नव्हे तर तब्बल 4 कोटी 18 लाख रुपये जिंकली.
महिला म्हणाली, मी एक दिवस लॉटरी जिंकेन असं लोकांना नेहमी सांगायची. आठवड्यातून एकदा मी एकाच स्टोअरमधून लॉटरीचं तिकीट घेते. पण ज्या दिवशी मी लॉटरी जिंकले त्या दिवशी टॅरो रिडिंगला जात होते, त्यामुळे दुसऱ्या दुकानातून लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, असं तिनं मिशिगन लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं वृत्त आज तकनं दिलं आहे.
दुसरं मूल हवं म्हणून कपलची सुप्रीम कोर्टात धाव; नेमकं प्रकरण काय?
महिलेची प्रतिक्रिया काय
महिला म्हणाली जेव्हा माझ्याकडे पैसा येणार ही भविष्यवाणी सांगण्यात आली तेव्हा मी माझ्या पर्समधील लॉटरीचा विचार बिलकुल केला नव्हता. घरी आल्यावर लॉटरी स्क्रॅच करताना छोटीमोठी रक्कम लागेल असं वाटत होतं. पण इतकी मोठी रक्कम लागेल याची कल्पनाही नव्हती.