दुसरं मूल हवं म्हणून कपलची सुप्रीम कोर्टात धाव; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करणारं कपल ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या कपलनं दुसऱ्या मुलासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

दुसऱ्या मुलासाठी सुप्रीम कोर्टात का गेलं कपल?
दुसऱ्या मुलासाठी सुप्रीम कोर्टात का गेलं कपल?
नवी दिल्ली : काही लोकांना एक मूल हवं असतं तर काहींना दोन मुलं. असंच दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करणारं कपल ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या कपलनं दुसऱ्या मुलासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या कपलच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर द्यायला सांगितलं आहे.
कपलला दुसरं मूल हवं होतं. पण दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यास तिच्या जीवाला धोका होता. म्हणून या कपलनं सरोगसीचा पर्याय निवडण्याचा विचार केला. पण सरोगसी कायद्यानुसार त्यांना असं करण्याची परवानी नाही. सरोगसी कायद्यातील तरतुदींमुळे त्यांना सरोगसीद्वारे दुसरं मूल जन्माला घालण्यात अडचण येत आहे.
advertisement
काय आहे सरोगसी कायद्यात?
जर पहिलं मूल निरोगी असेल आणि जोडप्याला सरोगसीद्वारे दुसरं अपत्य हवं असेल तर सरोगसी (नियमन) कायदा, 2021 च्या कलम 4(3)(c)(ii) अंतर्गत हे शक्य नाही. सरोगसी (नियमन) कायदा, 2021 च्या कलम 4(iii)(c)(ii) च्या तरतुदींनुसार, सरोगसीद्वारे मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना पात्रता प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र असं नमूद करेल की त्यांना आधी जैविकदृष्ट्या, दत्तक किंवा सरोगसीद्वारे कोणतीही जिवंत मुलं नाहीत. कपलनं यालाच सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.
advertisement
कपलनं याचिकेत काय म्हटलं?
जोडप्याने तरतुदीला 'अतार्किक, भेदभावपूर्ण आणि कोणत्याही वाजवी तत्त्वाशिवाय' असं संबोधलं आहे. ते म्हणाले की हे घटनेच्या कलम 21 (जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य) अंतर्गत हमी दिलेल्या महिलांच्या पुनरुत्पादक अधिकारांचं उल्लंघन आहे. पत्नीच्या पहिल्या अपत्यानंतर दुसऱ्या मुलाला जन्म देणं हा तिच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे सरोगसी हा शेवटचा पर्याय असल्याचं दाम्पत्याच्या याचिकेत म्हटलं आहे.
advertisement
कोर्टाचा निर्णय काय?
याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला त्यावर उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे.
सरोगसी म्हणजे काय?
सरोगसीचा अगदी सोप्या शब्दांत अर्थ सांगायचा झाला, तर एका दाम्पत्याचं बाळ दुसऱ्या महिलेच्या पोटात वाढवायचं. सरोगसी दोन प्रकारची असते. ट्रॅडिशनल (Traditional Surrogacy) आणि जेस्टेशनल (Gestational Surrogacy) असे ते दोन प्रकार आहेत.
advertisement
ट्रॅडिशनल सरोगसीमध्ये होणाऱ्या बाळाच्या पित्याच्या शुक्राणूंचं (Sperms) अर्थात स्पर्म्सचं सरोगेट मदरच्या बीजांडाशी (एग्ज) (Eggs) मीलन घडवलं जातं. त्यामुळे संबंधित महिला अर्थात सरोगेट मदर ही जन्माला येणाऱ्या बाळाची जैविक आई अर्थात बायोलॉजिकल मदर (Biological Mother) असते. थोडक्यात सांगायचं तर त्या बाळाशी तिचं रक्ताचं नातं असतं. जेस्टेशनल सरोगसीमध्ये मात्र सरोगेट मदरचं आणि बाळाचं रक्ताचं नातं नसतं. होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांच्याच अनुक्रमे बीजांड आणि शुक्राणूचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. त्यातून तयार झालेला भ्रूण टेस्ट ट्यूबद्वारे (Test Tube) सरोगेट मदरच्या गर्भाशयात (Uterus) प्रत्यारोपित केला जातो.
view comments
मराठी बातम्या/Viral/
दुसरं मूल हवं म्हणून कपलची सुप्रीम कोर्टात धाव; नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement