ड्र्यू बिन्स्की नावाचा ट्रॅव्हल ब्लॉगर, ज्याने जगातील 197 देशांना भेटी दिल्या आहेत. आपल्या अनुभवाच्या आधारे त्याने जगातील सर्वात धोकादायक शहराचा खुलासा केला आहे.जगातील सर्वात धोकादायक शहराची झलक त्याने दाखवली आहे.. या शहरात 2010 साली भूकंप आला होता, त्यात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
शंभर वर्षापासून बंद असलेलं जुनं घर कौडी मोलात विकलं, दरवाजा उघडताच नवीन मालकाला भलतंच दिसलं
advertisement
शहरातील रुग्णालये दुपारनंतर कर्मचाऱ्यांविना राहतात. अशा स्थितीत एखादा आजारी व्यक्ती रुग्णालयात आला तर त्याला मरण पत्करावं लागतं. जर कोणी आजारी पडला तर डॉक्टरांऐवजी त्याच्यावर वूडूने उपचार केले जातात इथं काळी जादू खूप केली जाते. इथं चांगली खाद्यपदार्थ उपलब्ध असलेली दुकानं फार कमी आहेत. शहरातील मिनरल वॉटर देखील अत्यंत दुर्गंधीयुक्त चवीने येते. या शहरात लोक संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर पडत नाहीत आणि कोणालाही घरात येऊ देत नाहीत.
या देशात पाय ठेवताच भारतीय होतो मालामाल, जगतो आलिशान आयुष्य
आता हे शहर कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. हे शहर आहे पोर्ट-ऑ-प्रिन्स, जी हैतीची राजधानी आहे. या व्यक्तीने जगातील सर्वात धोकादायक शहरांच्या यादीत या शहराला अग्रस्थानी ठेवलं आहे.
Drew Binsky युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.