TRENDING:

Yahya Sinwarचे शेवटचे क्षण, सोफ्यावर बसलेला, ड्रोन दिसताच फेकली काठी, VIDEO आला समोर

Last Updated:

Yahya Sinwar Last Video : याह्या सिनवार मारला गेल्यानंतर त्याचे शेवटचे क्षण टिपणारे ड्रोन फुटेज समोर आलं आहे. हा व्हिडीओ इस्रायली लष्कराने जारी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेल अवीव : हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलला मोठं यश मिळालंय. इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू हमासचा प्रमुख याह्या सिनवारचा इस्रायलने खात्मा केला. याह्या सिनवार मारला गेल्यानंतर त्याचे शेवटचे क्षण टिपणारे ड्रोन फुटेज समोर आलं आहे. हा व्हिडीओ इस्रायली लष्कराने जारी केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने माहिती दिली होती की, गाझामधील एका कारवाईत तीन अज्ञात दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी एक सिनवार असल्याची शक्यता आहे. तपास केल्यानंतर मृत्यू झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकजण सिनवार असल्याचं स्पष्ट झालं.
News18
News18
advertisement

बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास प्रमुखाला ठार केल्याचं सांगितलं. इस्रायलने याचा पुरावा दिला असून डीएनए कन्फर्म केला आहे. इस्रायली लष्कराने ड्रोन फुटेज जारी केलं असून त्यात दिसणारी व्यक्ती याह्या सिनवार असल्याचा दावा केलाय. सोफ्यावर बसलेला याह्या सिनवार मृत्यूच्या दारात असताना तो हातातल्या काठीने ड्रोनला पाडण्याचा प्रयत्न करतो.

याह्या सिनवार गाझामधील एका उद्धवस्त झालेल्या इमारतीत सोफ्यावर बसलेला दिसतो. अपार्टमेंटच्या भिंती बॉम्बस्फोट आणि गोळीबाराने पडल्या आहेत. व्हिडीओत दिसतं की हमास प्रमुख याह्या सिनवार गंभीर जखमी आहे. सोफ्यावरून त्याला उठतासुद्धा येत नाहीय. इस्रायली लष्कराचा ड्रोन जवळ येताच तो हातातली काठी फेकून मारतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की, डीएनए टेस्टनंतर हमास चिफ याह्या सिनवार याचाच खात्मा झाला असल्याचं स्पष्ट झालंय. याह्या सिनावरनेच ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ल्याचे आदेश दिले होते. सिनावरजवळ एक बुलेटफ्रूप जॅकेट आणि ग्रेनेड आढळलंय. गोळीबारात त्याला दुखापत झाल्यानतंर एकटाच इमारतीत घुसला होता. इस्रायलच्या जवानांनी परिसरात शोध घेण्यासाठी ड्रोन वापरला आणि त्यात याह्या सिनवार दिसून येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Yahya Sinwarचे शेवटचे क्षण, सोफ्यावर बसलेला, ड्रोन दिसताच फेकली काठी, VIDEO आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल