advertisement

खूप हाल सोसले! १३ मार्च पासून शनीचा अस्त, साडेसातीतून ३ राशींची सुटका होणार

Last Updated:

Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १३ मार्चपासून कर्मफलदाता म्हणून ओळखला जाणारा शनि ग्रह अस्त अवस्थेत जाणार असून २२ एप्रिलपर्यंत हा कालावधी प्रभावी राहणार आहे.

Astrology News
Astrology News
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १३ मार्चपासून कर्मफलदाता म्हणून ओळखला जाणारा शनि ग्रह अस्त अवस्थेत जाणार असून २२ एप्रिलपर्यंत हा कालावधी प्रभावी राहणार आहे. ग्रह अस्त म्हणजे तो सूर्याच्या अतिजवळ गेल्यामुळे त्याची प्रभावीता कमी झालेली मानली जाते. ज्योतिषांच्या मते, या काळात काही राशींवरील शनीचा कडक प्रभाव कमी होऊन सकारात्मक घडामोडींना सुरुवात होऊ शकते. विशेषतः साडेसाती आणि ढैय्याचा त्रास भोगणाऱ्यांसाठी हा टप्पा दिलासा देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१३ मार्च ते २२ एप्रिल बदलांचा काळ
ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शनी अस्त झाल्याने अडथळे, विलंब आणि मानसिक ताण यामध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. आर्थिक व्यवहार सुरळीत होण्याची चिन्हे दिसतील. या काळात संयम आणि शिस्त राखल्यास अनेकांना अपेक्षित यश मिळू शकते. काही राशींसाठी हा काळ करिअर, मालमत्ता आणि वैयक्तिक आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
advertisement
धनु
धनु राशीवर सध्या शनिची ढैय्या प्रभावी असल्याचे मानले जाते. मात्र शनी अस्त झाल्यानंतर या राशीच्या व्यक्तींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले प्रकल्प गती घेतील. नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. नोकरीत बदल किंवा बढतीची शक्यता नाकारता येत नाही. अचानक मालमत्ता खरेदीचा योग जुळू शकतो. आर्थिक स्थैर्य वाढेल आणि कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने चांगला राहील.
advertisement
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी अस्त हा अत्यंत शुभ मानला जात आहे. साडेसातीचा ताण काही प्रमाणात कमी होईल. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळू शकतो. रिअल इस्टेट किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार यशस्वी ठरू शकतात. करिअरमध्ये स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो.
मीन
मीन राशीच्या व्यक्तींमध्ये साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असल्याचे मानले जाते. शनी अस्त झाल्यानंतर मानसिक तणाव कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल. करिअरमध्ये उल्लेखनीय प्रगती होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल आणि कुटुंबातील संबंध अधिक दृढ होतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
खूप हाल सोसले! १३ मार्च पासून शनीचा अस्त, साडेसातीतून ३ राशींची सुटका होणार
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement