खूप कष्ट केले! आता 18 ऑगस्टपासून 3 राशींच्या लोकांनी फक्त पैसे मोजायचे, लक्ष्मी देवीची होणार कृपा

Last Updated:

GajKesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो केवळ अडीच दिवसांत आपली राशी बदलतो. त्यामुळे त्याची वारंवार इतर ग्रहांशी युती होत राहते आणि यामुळे विविध शुभ-अशुभ योग निर्माण होतात.

astrology news
astrology news
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो केवळ अडीच दिवसांत आपली राशी बदलतो. त्यामुळे त्याची वारंवार इतर ग्रहांशी युती होत राहते आणि यामुळे विविध शुभ-अशुभ योग निर्माण होतात. यंदा 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:29 वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे आधीच गुरु आणि शुक्र उपस्थित आहेत. या तिघांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होणार असून कालक्ष्मी व गजकेसरी राजयोगही उदयास येणार आहेत. हा योग 20 ऑगस्ट संध्याकाळी 6:34 वाजेपर्यंत प्रभावी राहील. या काळात 12 राशींवर वेगवेगळे परिणाम दिसतील, मात्र काही राशींवर विशेष लाभदायी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यात तूळ आणि कुंभ राशींचा समावेश होतो.
गजकेसरी राजयोगाचे महत्त्व
गुरु आणि चंद्राची युती होऊन तयार होणारा गजकेसरी योग हा अत्यंत शुभ मानला जातो. हा योग जीवनात भाग्यवृद्धी, धनलाभ, सामाजिक मान-सन्मान आणि मानसिक शांती देणारा आहे. विद्यार्थी, व्यापारी, नोकरी करणारे तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलणारे सर्वच लोक या काळात लाभ घेताना दिसतील. अडकलेली कामे मार्गी लागतील, नवीन संधी मिळतील तसेच अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो.
advertisement
मिथुन राशी
या राशीत गुरु आणि चंद्राची शुभ युती होत असल्याने गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. हा योग अत्यंत मंगलकारी आणि भाग्यवर्धक ठरणारा आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना जीवनात अनेक सकारात्मक आणि आनंददायी घडामोडी अनुभवायला मिळतील. वैयक्तिक तसेच कौटुंबिक आयुष्यात समाधान आणि सुख लाभेल. मुलांच्या शिक्षणात यश, करिअरमध्ये प्रगती किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना उत्कृष्ट निकाल मिळतील, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि भविष्याबद्दल आशावाद बळकट होईल.
advertisement
तूळ राशी
तूळ राशीच्या नवव्या घरात हा शुभ योग होत असल्याने या काळात नशिबाची साथ लाभेल. धर्म, अध्यात्म आणि यात्रांमध्ये रस वाढेल. अनेक जण तीर्थयात्रा, पूजा किंवा जप-ध्यानात सहभाग घेऊ शकतात. कौटुंबिक संबंधात सौहार्द टिकेल आणि भावंडांकडून चांगला पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल, तसेच स्पर्धा परीक्षांत चांगले निकाल अपेक्षित आहेत. पूर्वीची अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होतील आणि जुन्या अडचणी दूर होऊ लागतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. एकूणच हा काळ आध्यात्मिक प्रगतीसह कौटुंबिक आनंद देणारा ठरणार आहे.
advertisement
कुंभ राशी
कुंभ राशीच्या व्यक्तींना गजकेसरी योगामुळे आर्थिक क्षेत्रात मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील, जुन्या इच्छा पूर्ण होतील आणि पैशांची अडचण कमी होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व पगारवाढीची शक्यता आहे, तर नोकरी शोधणाऱ्यांना इच्छित संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवे करार, व्यवहार किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. निर्णयक्षमता मजबूत राहिल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि मुलांकडून सुखद बातमी मिळू शकेल.
advertisement
आरोग्य आणि सामाजिक जीवन
हा योग आरोग्यदायी परिणामही देणारा आहे. दीर्घकाळ त्रास देणारे आजार किंवा शारीरिक थकवा कमी होईल. मानसिक शांती लाभेल आणि नवीन ऊर्जा मिळेल. समाजातील प्रतिष्ठित लोकांशी संपर्क प्रस्थापित होतील, ज्यामुळे भविष्यात नवीन संधींचे दरवाजे उघडतील.
एकूणच, 18 ते 20 ऑगस्टदरम्यान चंद्र, गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे तयार होणारा हा गजकेसरी राजयोग काही राशींना विशेष भाग्यवान बनवणार आहे. तूळ आणि कुंभ राशींसाठी हा काळ जीवनात प्रगती, धनलाभ, आनंद आणि सामाजिक मान-सन्मान घेऊन येणार आहे.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
खूप कष्ट केले! आता 18 ऑगस्टपासून 3 राशींच्या लोकांनी फक्त पैसे मोजायचे, लक्ष्मी देवीची होणार कृपा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement