करिअरच्या बाबतीत यशस्वी होण्याची शक्यता; मेष राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील येणाऱ्या काळात घडणाऱ्या गोष्टीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल? जाणून घ्या.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील येणाऱ्या काळात घडणाऱ्या गोष्टीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग पुढचा काळ आपल्याला कसा असणार, महिनाभरात आपल्याला काय काय चांगल्या वाईट गोष्टी पाहायला मिळणार, हे देखील जाणून घेण्यासाठी बरेचजण उत्सुक असतात. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींच्या प्रेमाच्या बाबतीत आणि त्यांच्या इतर गोष्टींच्या भविष्याबाबत ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी माहिती दिली आहे.
advertisement
येणारा फेब्रुवारी महिना मेष राशीत जन्म घेतलेल्या जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल राहण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींच्या भाग्याच्या कृपेने त्यांना बरेच काम करण्याची संधी येत्या काळात मिळू शकते. तर प्रेमाच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींना येणारा काळ थोडा कठीण जाऊ शकतो, असे तरुण शर्मा यांनी सांगितलं आहे.
advertisement
1) विद्यार्थ्यांसाठी : विद्यार्थ्यांच्या बाबतीत मेष राशीच्या जातकांना फेब्रुवारी महिन्यातील सुरुवातीचाच काळ थोडा अधिक कठीण असू शकतो. मात्र शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींद्वारे केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे.
2) नोकरी / व्यवसाय : मेष राशीच्या जातकांची काही थांबलेली कामे असतील, तर अशा कामात तेजी येईल. व्यापार करणाऱ्या जातकांना व्यापाराच्या बाबतीत यात्रा कराव्या लागू शकतात, ज्या त्यांना लाभदायक सिद्ध होतील.
advertisement
3) आर्थिक : मेष राशीच्या जातकांच्या बाबतीत खर्चात वृद्धी होण्याच्या कारणाने धनाच्या संबंधित तणावाचा सामना करावा लागू शकतो. परंतु, कमाई होत राहील, मनात उत्तम विचार येत राहतील. धर्म-कर्माच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्ती खूप उत्साहाने भाग घेतील.
4) आरोग्य : येणारा फेब्रुवारी महिना स्वास्थ्य दृष्टिकोनातून चढ-उताराचा असणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्ती आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतील. मेष राशी स्वामी महिन्याच्या सुरुवातीमध्ये नवम भावात राहतील आणि त्यानंतर दशम भावात येतील, जे तुम्हाला उत्तम स्वास्थ्य प्रदान होऊ शकते.
advertisement
5) प्रेमसंबंध : मेष राशीच्या व्यक्ती जर प्रेम संबंधात असतील तर, फेब्रुवारी महिन्याची सुरुवातच त्यांच्यासाठी कठीण जाऊ शकते. यावेळी अशा व्यक्ती आपल्या नात्यासाठी किती पक्क्या आहेत, याची परीक्षा शनिदेवच घेतील. जे या राशीच्या पंचम भावाला पाहत आहे. मेष राशीच्या विवाहित जातकांच्या वैवाहिक जीवनासाठी हा महिना अनुकूल असणार आहे. कारण, अशा व्यक्तींच्या सप्तम भावावर ग्रहांचा प्रभाव अनुकूल असल्या कारणाने ते आपल्या जीवनसाथीची पूर्ण काळजी घेतील.
advertisement
प्रेमासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागेल, तूळ राशीच्या लोकांना फेब्रुवारी कसा असेल? Video
दरम्यान मेष राशीच्या जातकांसाठी येणारा महिना प्रेमाच्या बाबतीत थोडा कठीण जाऊ शकतो. मात्र आपल्या जोडीदाराशी असणारे आपले घट्ट नाते हा काळ सुखकर बनवू शकते. त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी लहान मुलांना गूळ आणि चण्याचा प्रसाद वाटला पाहिजे, असेही तरुण शर्मा यांनी सांगितलं आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
February 03, 2024 9:09 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
करिअरच्या बाबतीत यशस्वी होण्याची शक्यता; मेष राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video