केलेल्या मेहनतीचे मिळेल फळ; मेष राशीसाठी कसं असेल 2024 वर्ष? पाहा Video

Last Updated:

एखादा दिवस, महिना किंवा वर्ष बदलणार असेल तर हा काळ आपल्यासाठी कसा असेल हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. 2024 वर्ष मेष राशीच्या लोकांना कसं असेल? पाहा

+
News18

News18

धाराशिव, 30 डिसेंबर : लवकरच आता 2024 नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांना नववर्षाचे वेध लागले आहेत. एखादा दिवस, महिना किंवा वर्ष बदलणार असेल तर हा काळ आपल्यासाठी कसा असेल हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे यासाठी राशिभविष्य पाहिलं जातं. त्यामुळे 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल याबाबत धाराशिव शहरातील ज्योतिषी प्रशांत झालटे यांनी माहिती दिली आहे.
कसं असेल नवं वर्ष? 
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्य वेगवेगळे असते. आपण आता नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यामुळे 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर असेल. आपण केलेल्या मेहनतीचे आपल्याला फळ मिळेल. मेष राशीचा स्वामी मंगल आहे. त्यामुळे मंगल या शब्दाप्रमाणे सर्वांचे मंगल करेल. हे वर्ष मेष राशीसाठी अतिशय आनंदाचे असणार आहे. मनाची इच्छा पूर्ण करणारे आणि मनाला उभारी देणारे असणार आहे, असं ज्योतिषी प्रशांत झालटे सांगतात.
advertisement
या महिन्यानंतर करियरची संधी.., पाहा कन्या राशीसाठी कसं असेल नवीन वर्ष? Video
ज्यांना गृह खरेदी, वाहन खरेदी, परदेशवारी त्याचबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनोरथ यावर्षी पूर्ण होणार आहेत. 2024 वर्षात मेष राशीच्या विवाह इच्छुक असणाऱ्यांचे सप्टेंबर महिन्यानंतर विवाह योग जुळून येतील. मेष राशीसाठी 2024 वर्ष आनंददायी, व्यावसायिक दृष्टिकोनातून भरभराटीचे, चांगल्या आरोग्याचे असणार आहे.
advertisement
राहु हा थोडा मेष राशीसाठी त्रासदायक असणार आहे. या करता महादेवाची उपासना करावी. जेणेकरून आपल्यावा कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही, असंही ज्योतिषी प्रशांत झालटे यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
केलेल्या मेहनतीचे मिळेल फळ; मेष राशीसाठी कसं असेल 2024 वर्ष? पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement