Shravan 2025: श्रावण महिन्यात पूजा-उपवास करणाऱ्यांनी या रंगाचे कपडे घालणे शुभ फळदायी
- Published by:Ramesh Patil
- local18
Last Updated:
Shravan 2025 Tips: श्रावण महिन्यात पूजा करताना तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता हे देखील खूप महत्वाचे मानले जाते. श्रावण महिन्यासाठी काही रंग शुभ असतात, तर काही रंग अशुभ देखील मानले जातात.
अयोध्या: भोलेनाथांचा पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे. हा संपूर्ण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या काळात शिवभक्त वेगवेगळ्या पद्धतीनं भोलेनाथाची पूजा करतात, शिवलिंगावर जल अर्पण करून त्यांचे विशेष आशीर्वाद मिळवतात. धार्मिक श्रद्धेनुसार, श्रावण महिन्यात पूजा करताना तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता हे देखील खूप महत्वाचे मानले जाते. श्रावण महिन्यासाठी काही रंग शुभ असतात, तर काही रंग अशुभ देखील मानले जातात.
पूजा करताना नेहमी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, याविषयी जाणून घेऊ. 25 जुलै रोजी श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात शिवभक्त भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात, तुम्हीही पूजा करणार असाल तर पूजेदरम्यान कोणत्या रंगाचे कपडे घालावेत. याविषयी सविस्तरपणे समजून घेऊया.
श्रावणात कोणता रंग शुभ मानला जातो -
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होत आहे. या महिन्यात हिरवे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. विवाहित महिला हिरव्या साड्या आणि हिरव्या बांगड्या परिधान करतात, असे मानले जाते की श्रावण महिन्यात हिरवे कपडे परिधान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. यासोबतच, देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात पूजा-उपवास करणाऱ्यांनी विशेषतः हलके गुलाबी, पांढरे, हिरवे असे कपडे परिधान करावेत. याशिवाय केशरी, लाल, पिवळे, गुलाबी हे काही रंग शुभ मानले जातात.
advertisement
श्रावणात या रंगाचे कपडे वापरू नयेत -
श्रावण महिन्यात काही रंगाचे कपडे वापणे टाळावे. व्रत उपवास करणाऱ्यांनी श्रावणात काळे कपडे परिधान करू नयेत, त्यामुळं जीवनात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. याशिवाय, महादेवाची पूजा करणाऱ्यांनी तपकिरी आणि खाकी रंगाचे कपडे देखील परिधान करणे टाळावे. ते अशुभतेचे प्रतीक मानले जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2025 4:47 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: श्रावण महिन्यात पूजा-उपवास करणाऱ्यांनी या रंगाचे कपडे घालणे शुभ फळदायी