Signature Astrology: उतरती कळा लागते! अशा प्रकारे सही करणाऱ्यांनी वेळीच अलर्ट व्हा; अर्थसंकट वाढतं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Signature Astrology: आपण कशी सही करतो याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येक व्यक्तीची सही अनोखी असते. सहीचा आकार, शब्दांचा वापर, रेषा वेगवेगळी असते. सही करण्याच्या पद्धतीवरून एखाद्या व्यक्तीचे भविष्य सांगता येते.
मुंबई : सही कशी असावी कशी नसावी, याविषयी गेले काही दिवस झाले आपण माहिती घेत आहोत. ज्योतिषशास्त्रात सही कशाप्रकारे केली जाते, याला विशेष महत्त्व आहे. आपण कशी सही करतो याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येक व्यक्तीची सही अनोखी असते. सहीचा आकार, शब्दांचा वापर, रेषा वेगवेगळी असते. सही करण्याच्या पद्धतीवरून एखाद्या व्यक्तीचे भविष्य सांगता येते. आपण करत असलेली सही सतत आर्थिक नुकसान करून एखाद्या व्यक्तीला हळूहळू गरीब करू शकते. काही प्रकारच्या सह्यांमुळे वडिलोपार्जित मालमत्तासुद्धा नष्ट होऊ शकते. दारिद्र्य वाढवणाऱ्या सह्यांविषयी जाणून घेऊ.
सिग्नेचर ज्योतिष तज्ज्ञ विवेक त्रिपाठी यांच्या मते, ज्यांच्या स्वाक्षरीत गोमूत्र रेषा असते त्यांना हळूहळू क्षीणता येते आणि त्यांची वडिलोपार्जित मालमत्ताही नष्ट होते. अशा लोकांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली मालमत्ता टिकवून ठेवता येत नाही. अशी व्यक्ती त्यांची सर्व वडिलोपार्जित मालमत्ता विकते आणि कर्जात बुडते. ती व्यक्ती आपल्या वडिलांचा वारसा नष्ट करते.
अशा प्रकारे सही करणारे लोक वडिलोपार्जित संपत्तीचा नाश करतातच आणि त्यांची कमाई केलेली संपत्ती देखील वाया घालवतात. यामुळे गरिबीत दिवस काढावे लागतात. सहीमधील गोमूत्र रेषा अत्यंत हानिकारक आणि अशुभ मानली जाते. ती पर्वताच्या लाटेपेक्षा किंवा समुद्राच्या लाटेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते.
advertisement
सहीतील गोमूत्र रेषा - दारिद्र्य निर्माण करणारी स्वाक्षरीतील गोमूत्र रेषा खूपच लाटांसारखी असते. एखादी व्यक्ती सहीमध्ये सुरुवातीचे किंवा शेवटचे अक्षर जोडून लाटेसारखी रेषा काढत असेल तर या लाटकी रेषेला गोमूत्र रेषा म्हणतात. गोमूत्र रेषा आणि पर्वताच्या लाटे किंवा समुद्राच्या लाटेतील फरक ओळखणे हे खूपच गुंतागुंतीचे असते. स्वाक्षरी ज्योतिषातील तज्ज्ञच ती योग्यरित्या ओळखू शकतात आणि विश्लेषण करू शकतात.
advertisement
सहीतील पर्वतीय लाटा आणि समुद्राच्या लाटा लोकांना बरेच फायदे देतात, परंतु गोमूत्र रेषा हानीकारकच मानली जाते. गोमूत्र रेषा एखाद्या व्यक्तीला अधोगतीकडे घेऊन जाते. तिच्या लाटा तुमच्या आयुष्यात अशांतता निर्माण करू शकतात. काही लोक सहीच्या पहिल्या अक्षरावर, शेवटच्या अक्षरावर, खाली किंवा वर गोमूत्र रेषा काढतात. कधीकधी स्वाक्षरीच्या मध्यभागी गोमूत्र रेषा दिसते.
advertisement
अशा प्रकारच्या सहीवरील उपाय -
सहीमध्ये गोमूत्र रेषा ओढणाऱ्यांनी तसं करणं बंद करावं. जे लोक सतत कर्जात बुडालेले असतात, वडिलोपार्जित मालमत्ता विकत आहेत किंवा ज्यांचे बँक बॅलन्स संपलेला असतो, त्यांनी आपल्या सह्या काळजीपूर्वक तपासून पहाव्यात. गोमूत्र रेषा अडचणी वाढवते, अधिक माहितीसाठी तुम्ही स्वाक्षरी ज्योतिषातील तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Signature Astrology: उतरती कळा लागते! अशा प्रकारे सही करणाऱ्यांनी वेळीच अलर्ट व्हा; अर्थसंकट वाढतं


